अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्नचं राहणार,अजित दादांच्या मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचं मोठं विधान
आय मिरर
अजित पवार हे मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार आणि अजित पवारांनी आता युएनचे अध्यक्ष म्हणून जनतेला पत्र लिहिले तरी काही फरक पडणार नाही असा टोला खा.शरद पवारांनी लगावला आहे.
शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचाच नव्हता. सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदी बसवून भाजपसोबत जाण्याचा शरद पवारांचा डाव होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष करा, हा प्रस्ताव छगन भुजबळांनीच दिला होता. माझ्यासोबत असणाऱ्या काही सहकाऱ्यांचा आपण भाजपसोबत जावे, असा आग्रह होता असं म्हटले आहे.परंतु माझा या गोष्टीला स्पष्ट नकार होता.असही शरद पवारांनी म्हटलं आहे.
तर भाजपचा विचार हा देशाच्या हिताचा नाही.समाजात, जाती धर्मात फूट पाडून भाजपचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊ शकत नसल्याचे सहकाऱ्यांना स्पष्ट केले होते असही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
तरी देखील काही जण भाजपसोबत जाण्यावर आग्रही होते.मी राजीनामा दिल्यानंतर कमिटीची स्थापना केली होती. तेव्हा छगन भुजबळ यांनीच सुप्रियांना अध्यक्ष करा असा प्रस्ताव दिला होता.अशी माहितीही शरद पवार यांनी दिली आहे.
What's Your Reaction?