बिग ब्रेकिंग ! पुण्यात बावनकुळे चंद्रकांत पाटलांना दाखवले काळे झेंडे, मराठा समाज आक्रमक
आय मिरर
खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते.याच दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर इथं मराठा बांधवांकडून काळे झेंडे दाखविण्यात आले. या सरकारचा करायचा काय खाली डोकं वर पाय, या सरकारचा निषेध असो ,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शिरूर लोकसभा मतदार संघात दौरा करायला वेळ आहे,पण गेल्या 12 दिवसांपासून राजगुरुनगर इथं उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांच्या भावना जाणून घ्यायला भेटायला वेळ नाही.याचमुळे मराठा समाजातील कार्यकर्ते यांनी आक्रमक होऊन काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला.
What's Your Reaction?