इंदापूरात कारचा टायर फुटून अपघात,डाळज येथे घडली घटना - पाच जण ठार

Jul 2, 2024 - 20:36
Jul 2, 2024 - 20:37
 0  3614
इंदापूरात कारचा टायर फुटून अपघात,डाळज येथे घडली घटना - पाच जण ठार

आय मिरर

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिझा गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण ठार झालेत...तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एक जण बचावला गेला आहे.

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 येथे राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झाला.या अपघातात गाडीचा पुढच्या बाजूचा पूर्णतः चुराडा झाला.   

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे कडून सोलापूर च्या दिशेने निघालेली (टी एस ०७ जी एल २५७४) ही गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने साधारण ५० मीटर गाडी जमिनीला घासत येऊन डाव्या साईडला चार ते पाच पलट्या खात ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जोरात धडकून नाल्यात जाऊन पडलीय...गाडीत सहा पुरुष होते त्यापैकी ४ जण जागीच ठार तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

इरफान पटेल वय 24 वर्षे, मेहबूब कुरेशी ,वय 24 वर्षे , फिरोज कुरेशी, वय 26 वर्षे ,फिरोज कुरेशी वय 28 वर्षे हे सर्व जागीच मयत झाले तर रफिक कुरेशी वय 34 वर्षे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

सय्यद इस्माईल अमीर ह्याला किरकोळ मार लागला आहे.सर्व तेलंगणा राज्यातील नारायणखेड ,तालुका जिल्हा मेंढक येथील आहेत.

अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना व ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow