…अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा भिगवण ग्रामपंचायतीला दिला इशारा

Oct 6, 2023 - 14:36
Oct 6, 2023 - 14:39
 0  1977
…अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा भिगवण ग्रामपंचायतीला दिला इशारा

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय भिगवण स्टेशन येथील जुनी इमारत दुरुस्ती लवकरात लवकर न केल्यास शाळेला टाळे ठोकनाचा इशारा पंचशील सेवाभावी संस्थाचे सचिव रोहित मिसाळ यांनी ग्रामपंचायत भिगवण यास दिलाआहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय भिगवण स्टेशन येथील जुनी इमारत दिनांक 9 - 2 -2023 रोजी 1 लाख 75 हजार रुपये रकमेस लिलाव पद्धतीने कुंडलिक बबन सातपुते यांना 15 दिवसात पाडून शाळेच्या ताब्यात देण्याचे ठरले होते त्या पद्धतीने त्यांनी शाळा पाडून व ठरलेली लिलावाची रक्कम ग्रामपंचायत भिगवण यास रोख पद्धतीने जमा केली सदरील रकमेतून राहिलेल्या चार खोल्या दुरुस्तीचे एक महिन्यांमध्ये पत्रे दरवाजे फरशी व कलरचे काम करण्याचे ठरविण्यात आले होते. आज जवळपास 6 ते 7 महिने पूर्ण होऊन सुद्धा अद्याप तिथे कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम झालेले नाही शाळेतील मुलांची शिक्षण घेण्यास प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे खिडकी दरवाजे व्यवस्थित नसल्यामुळे साप खोलीमध्ये फिरण्याचे सुद्धा प्रकार झालेले आहेत , तसेच खोलीवरील पत्रे खिल खिळे झाल्यामुळे ते कधीही उडून एखाद्या मुलाच्या अंगावर येण्याची पडण्याची दाट शक्यता आहे, असा काही प्रकार घडल्यास ग्रामपंचायत भिगवण त्यास पूर्णपणे जबाबदार राहील असे ग्रामपंचायत भिगवण यास निवेदना मार्फ़त पत्र रोहित मिसाळ यांनी दिले आहे.

शाळा दुरुस्तीचे काम सुरू केले होते परंतु तेथे काम करणाऱ्या व्यक्तीला इजा झाल्यामुळे तसेच पाऊस चालू असल्यामुळे काम थांबले आहे तसेच सदरचे काम हे ठेकेदाराला न देता ग्रामपंचायत स्वतः करीत आहे विद्यार्थी हित लक्षात घेता सदरचे काम तात्काळ पूर्ण करू. - ग्रामसेवक दत्तात्रय परदेशी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow