मुलींना शिकवून त्यांच्या पायावर उभं करणं हेच माझं धेय्य : अध्यक्ष जयवंत नायकुडे

आय मिरर
पुण्याच्या इंदापूरमधील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजात 09 आँगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी नर्सिंग चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्यावर ठेका धरत आपल्या कलागुणांचे सादरिकरण केले. शिवाय 151 झाडांचे संस्थेच्या कार्यस्थळावर रोपन केले.यात इंदापूर मधील पतंजली योग समिती,वृक्ष संजीवनी ग्रुप यांचा सहभाग होता.
संस्थेचे अध्यक्ष जयवंत नायकुडे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की,गेल्या तीन वर्षापासून या इन्स्टिट्यूट मध्ये हा आदिवासी दिन साजरा केला जातो.आदिवासींची जी कला आहे त्यांची जी परंपरा आहे ती पुढे चालू ठेवण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.इंदापूर मधील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजात स्थापनेपासून बहुतांश आदीवासी भागातील मुली नर्सिंग क्षेत्रातील प्रशिक्षण घेतात.विशेष करुन अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील मुली इथे प्रशिक्षण घेतात.
आजच्या दिवशी त्यांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा आणि त्यांच्या सुप्तगुणांना वाव देता यावा या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करतो,शिवाय मुली शिकून मोठ्या हव्यात त्यांच्या पायावरती त्या उभ्या रहाव्यात स्वावलंबी बनाव्यात अशी संस्थाचालक म्हणून माझी अपेक्षा आहे. त्या स्वतःच्या पायावर शिकून उभ्या राहिल्या पाहिजेत हे माझं ध्येय असून मी ते पूर्णत्वास जरूर नेईल.असा मला विश्वास आहे असं नायकुडे म्हणाले.
या कार्यक्रामास इंदापूरच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा,माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे,इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.नामपल्ले,माजी उपनगराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे,शिवसेनेचे विशाल बोंद्रे,माजी नगरसेवक प्रशांत शिताफ, सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा,योगेश लबडे,हमीद आतार, नवनाथ कातकडे,राष्ट्रवादी काँग्रेस श.प.गटाच्या महिलाध्यक्षा छाया पडसळकर,तेजपृथ्वी गृपच्या अध्यक्षा अनिता खरात,गृहपाल सविता खारतोडे,रेश्मा शेख,लता नायकुडे,उर्मिला नायकुडे,प्राचार्या अनिता मखरे, जयश्री खबाले,वैशाली माने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी आणि शालेय विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.सुत्रसंचालन तेजस्विनी आठवले यांनी केले तर आभार सानिला फुलारी यांनी मानले.
What's Your Reaction?






