डिकसळ ग्रामपंचायत कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील डिकसळ ग्रामपंचायतच्या कार्यलयासमोर ग्रामदैवत योगेश्वरी मंदिराच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरले आहे. गेले कित्येक दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गटर लाईन फुटल्याने या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
योगेश्वरी मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सव साजरा केला जाणार असून या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक भाविक येत असतात. नवरात्र उत्सवानिमित्त हा परिसर स्वच्छ असणे गरजेचे असताना येथे मात्र दुर्गंधी असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते व योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी व्हा.चेअरमन सोमनाथ भादेकर यांनी घटस्थापनेपूर्वी या गटर लाईनची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था करुण येथील दुर्गंधीचा बंदोबस्त केला नाही तर आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर लेखी तक्रार देणार असुन येथील नागरिकांच्या आरोग्यास काही धोका झाला तर याला ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे सांगितले.
याविषयी येथील ग्रामसेविका प्रतिभा देवकाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील गटर लाईनचे गळती थांबवण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे परंतु कामगार मिळत नसल्याने या कामाला विलंब झाला आहे परंतु आम्ही घटस्थापनापूर्वी हा प्रश्न मार्गी लावणार आहे.
What's Your Reaction?






