'खाकी' तील माणुसकीला पाझर फुटला ! गरोदर महिलेची महिला ट्रॅफिक पोलीसांनीचं केली प्रसूती

Dec 4, 2024 - 06:47
Dec 4, 2024 - 06:49
 0  616
'खाकी' तील माणुसकीला पाझर फुटला ! गरोदर महिलेची महिला ट्रॅफिक पोलीसांनीचं केली प्रसूती

आय मिरर

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या दोन महिला पोलिसांनी कर्तव्यावर असताना प्रसव वेदनेने त्रासलेल्या एका गरोदर महिलेची सुखरूप प्रसूती केलीय.त्याच्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या दोन्ही महिला पोलिसांना गौरविले आहे.अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख अशी या हिंजवडी वाहतूक विभागात काम करणाऱ्या महिला पोलिसांची नावे आहेत.

रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाकड नाका येथे हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असणाऱ्या अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांना एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचे समजले , या दोघीही वेळ न दवडता तात्काळ गरोदर असलेल्या राजश्री माधव वाघमारे यांच्या मदतीला धावून आल्या.

रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यास विलंब होत असल्याने असह्य वेदना होत असलेल्या राजश्री यांना रस्त्याला कडेला असलेल्या खोलीच्या आडोशाला नेले व महीलेला धीर दिला रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यापूर्वीच राजश्री यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

डॉक्टर आल्यानंतर त्यांनी बाळ आणि राजश्री यांची तपासणी केली आणि पुढील उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या मदतीमुळे खाकिमधील माणुसकीला पाझर फुटला असच म्हणावं लागेल. दरम्यान इथून पुढं ही आम्ही कर्तव्यावर असताना असच सर्वांच्या मदतीला धावून जाणार असल्याचं अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी म्हटलंय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow