आमदार दत्तात्रय भरणेंनी घेतला क्रीडा संकुलातील विकास कामांचा आढावा,आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करणार

Jun 15, 2024 - 08:24
Jun 15, 2024 - 08:37
 0  744
आमदार दत्तात्रय भरणेंनी घेतला क्रीडा संकुलातील विकास कामांचा आढावा,आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करणार

आय मिरर

पुण्याच्या इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज सकाळी सात वाजताच इंदापूर शहरातील क्रीडा संकुलाला भेट देत विविध विकास कामांचा आढावा घेतलाय.खेळाडूंशी संवाद साधत इंदापूरकरांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा लवकरचं या ठिकाणी निर्माण केल्या जातील असं आश्वासन भरणे यांनी दिलयं…

आ.भरणे यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केलेय.ते म्हणाले की,तुमच्याकडून घरच्यांच्या खूप अपेक्षा आहेत. आई-वडिलांच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पेटून उठा. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. कष्ट परिश्रम मेहनत घेतल्याशिवाय तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत. दगडावरून काट्यावरून काचा वरून मी चालेल पण आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करीत ही जिद्द उराशी बाळगा ध्येय निश्चित करा. आजचे दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते वाया घालवू नका.

क्रीडा संकुलात काय अडचणी आहेत ?काय केलं पाहिजे ?इंदापूरचे क्रीडा संकुल जिल्ह्यात आदर्श ठरविण्यासाठी काय करायला हवं यासाठी आज मुद्दामहून क्रीडा संकुलात ही बैठक घेतली आहे. या ठिकाणी रस्त्यांच्या सोयी केलेल्या आहेत आणखीही सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील. ज्या काही अडचणी असतील त्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना प्रशासनाला मी दिले आहेत. मात्र या क्रीडा संकुलाची काळजी ही तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे.

पावणे दोन कोटी रुपये स्विमिंग टॅग करिता मंजूर केले आहेत. लवकरच ते काम पूर्ण केले जाईल. या ठिकाणी चांगली अभ्यासिका देखील केली. बोलण्यापेक्षा आपण कृतीतून हे दाखवून देऊ असं आवाहन भरणे यांनी केले.

मी पण शेतकरी कुटुंबातील आहे मलाही कधी वाटले नव्हते आमदार होईल मंत्री होईल जिल्हा परिषद अध्यक्ष होईल पण मी प्रयत्न केला त्यासाठी कष्ट केले. तेव्हाही स्वप्न पूर्ण होतात असंही भरणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,पोपट शिंदे,सुनिल मोहिते,तुकाराम बानकर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow