आमदार दत्तात्रय भरणे उद्या सकाळी सातलाच मैदानात ; असा असेल उद्याचा दौरा
आय मिरर
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते उद्याच्या होणाऱ्या विधानसभेकडे,अवघ्या राज्यात प्रत्येक मतदार संघात फक्त विधानसभेचीच चर्चा आहे. पुण्याच्या इंदापूर मतदार संघात ही काही चित्र वेगळं नाही. पुन्हा 2024 चं मैदान मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे पुढे सरसावले आहेत.
बारामती लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यात पदाधिकाऱ्यात आणि कार्यकर्त्यात नाराजी होती. मात्र आता सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेत लागलेल्या वर्णीने ही नाराजी दूर झाली आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते विधानसभेच्या तयारीला लागले असून उद्या शनिवारी 15 जून रोजी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत इंदापुरात विविध बैठका पार पडणार आहेत.
दत्तात्रय भरणे सकाळी सात वाजताच इंदापूर शहरातील क्रीडा संकुलात आढावा बैठक घेणार आहेत.तर त्यानंतर सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृहात पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन त्या संदर्भातील सूचना देणार आहेत.यासोबतच इंदापूर तालुक्यातील काही भाग दुष्काळाचा सामना करतोय त्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा आढावाही आमदार भरणे घेणार आहेत.
What's Your Reaction?