हर्षवर्धन पाटील ठोकणार भाजपला रामराम ? पितृपंधरवडा संपताच घेणार मोठा निर्णय
आय मिरर
पितृपंधरवडा संपताच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील मोठा राजकीय निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाऊन तुतारी फुंकण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.
इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथे हर्षवर्धन पाटील यांनी आज शनिवारी दि.28 सप्टेंबर रोजी मतदारांशी संवाद साधलाय आणि या संवादावेळीच कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नाराही दिला आहे.
2024 ची निवडणूक आपण लढवावी असा जनतेचा आग्रह असून कोणतं चिन्ह घ्यावं काय करावं याबाबत जनतेने स्पष्ट मत मांडले आहे. लोकशाहीत जनता श्रेष्ठ असते, जनतेचा जो आग्रह आहे त्याचा मी विचार करावा असं तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून माझ्यावर प्रेशर आहे. पितृ-पंधरवाडा संपताचं याबाबतचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल. जनतेच्या मनामध्ये जे आहे त्याला मला डावलता येणार नाही यावर योग्य तो निर्णय करून पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटल आहे.
काही लोकांचं म्हणणं आहे तुतारी सोबत चला काही लोकांचे म्हणणे अपक्ष चला काही लोकांचं म्हणणं आहे इंदापूरच्या जागा आपल्याला सुटली पाहिजे त्याचा सर्व विचार करून मी पुढील राजकीय निर्णय घेणार आहे.मी हर्षवर्धन पाटील यांच्याशी आज बोलणार आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते मात्र अद्याप पर्यंत ते माझ्याशी बोलले नाहीत असं ते म्हणाले
माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे. आणि या सोहळ्याचं निमंत्रण मला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेले आहे.या निमंत्रणाचा स्वीकार मी केलाय आणि त्यामुळे शरद पवारांसोबत मी एका मंचावरती या कार्यक्रमाला जाणार आहे असं पाटील म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसापासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील आणि इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत.आज फक्त हर्षवर्धन पाटील यांनीच या संदर्भातील संकेत दिल्याने पुढील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?