'आम्ही सांगेल तो पक्ष अन् चिन्ह' पणं पाटलांनी मैदान लढायचचं ! सामांन्यांच्या सुरावर हर्षवर्धन पाटील कोणता निर्णय घेणार ?

Sep 20, 2024 - 09:43
Sep 20, 2024 - 10:15
 0  426
'आम्ही सांगेल तो पक्ष अन् चिन्ह' पणं पाटलांनी मैदान लढायचचं ! सामांन्यांच्या सुरावर हर्षवर्धन पाटील कोणता निर्णय घेणार ?

आय मिरर

गेल्या काही दिवसापासून भाजपचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार की नाही यावर चर्चा सुरू आहेत.तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांना महायुतीतून उमेदवारी डावलल्यास ते कोणता निर्णय घेणार याची ही उत्सुकता आहे.मात्र हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते आणि समर्थक तेल लावून मैदान लाढयला सज्ज असल्याचं पहायला मिळतय. आता साहेब निर्णय घेणार नाहीत तर निर्णय आम्ही करु ! आम्ही सांगेल तो पक्ष आणि सांगेल तेच चिन्ह असेल पण पाटील इंदापूरचं मैदान लढवणारचं अशी भुमिका हजारो कार्यकर्त्यांनी घेतल्याने पाटलांच्या भुमिकेकडे सर्वांची नजर लागलेली आहे.

गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील हे शरदचंद्र पवार पक्षात जातील आणि तुतारी हाती घेतील अशा चर्चा आहेत. आषाढीच्या वारीतही हर्षवर्धन पाटील सहभागी झाले आणि त्यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी वाजवली."रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी" असा नाराही दिला. त्यानंतरच हर्षवर्धन पाटलांच्या तुतारी घेण्याच्या चर्चांना वेग आला.

दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील एका बैठकीदरम्यान हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची गुप्त चर्चा झाली. मात्र दोघांमध्ये काय ठरलं हे अद्याप पुढे आलं नाही दुसरीकडे शरद पवार यांनी समरजीत घाटगे यांच्या पक्षप्रवेशानंतर सुतोवाच केला की राज्यातील अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत आणि हळूहळू सर्वांचाच पक्षप्रवेश करून घेणार आहोत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रक्ष प्रवेशाच्या चर्चांना दुजोरा मिळाला.

"तुतारीवर लढल्यास भरणेंना पाडणं सोपं" कार्यकर्त्यांचा सूर

2014 आणि 2019 ला राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. हा पुन्हा पराभव हर्षवर्धन पाटील समर्थक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे समर्थक या पराभवाचा वाचपा काढण्याच्या तयारीत असतानाचं गेल्या वर्षभरापूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आणि पाटलांच्या अडचणी वाढल्या. आता भरणेंना चितपट करायचा असेल तर पवारांची तुतारीच हाती घ्यावी लागेल तरच आपण भरणेंना पाडू शकतो असा सूर कार्यकर्त्यांचा आहे त्यामुळे इंदापूर तालुका विकास आघाडीपेक्षा तुतारीच बरी असंही कार्यकर्ते म्हणतात.

गेल्या वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले. यामध्ये दत्तात्रय भरणे यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून दत्तात्रय भरणे हे शरद पवारांच्या रडारवर आहेत. इंदापूर मध्ये झालेल्या जाहीर सभेतही शरद पवारांनी दत्तात्रय भरणे यांना टार्गेट करत झालेली चूक सुधारुन काढा असा संदेश इंदापुरकरांना दिला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दत्तात्रय भरणेंना पाडणं हेच पवारांचे लक्ष असणार आहे.तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आ.भरणे हे पाटलांचे राजकीय विरोधक आहेत.त्यामुळे शरद पवारांसोबत जानं कार्यकर्त्यांना अधिक सोईचं वाटत आहे.

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार हर्षवर्धन पाटील यांची सावध भूमिका

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा असताना अद्याप पर्यंत हर्षवर्धन पाटील यांनी यावर कोणतही भाष्य केलं नाही.मागील आठवडाभरातच हर्षवर्धन पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या घरी गणपती बाप्पाच्या आरतीला उपस्थिती लावली आणि याच ठिकाणी आपण भाजपसोबत असल्याचं ही म्हटलं. मात्र दुसऱ्याच दिवशी इंदापुरात शरद पवारांसोबत हर्षवर्धन पाटलांचा एक बॅनर झळकला आणि तुतारीच्या चर्चांनी जोर धरला. 

सध्या हर्षवर्धन पाटील कमालीचे शांत दिसत असले तरी राजकीय डाव टाकण्यात ते माहिर आहेत. महायुतीचं जागावाटप अद्याप झालं नाही. इंदापूर विधानसभेची जागा महायुतीत कोणाच्या वाटेला जाणार यावर ही शिक्का मोर्तब होणं बाकी आहे. मात्र 2014 पासून अजित पवार गटाचे नेते दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्याची धुरा सांभाळत असल्याने महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीलाच म्हणजे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.त्यामुळे हर्षवर्धन पाटील सावध पवित्रा घेत पुढची राजकीय दिशा ठरवण्याच्या मार्गावर आहेत. जो ही राजकीय निर्णय घ्यायचा आहे तो कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेसोबत चर्चा करून घेणार आणि सर्वसामान्य जनता कार्यकर्ता जो निर्णय देईल तो मी मान्य करणार असं हर्षवर्धन पाटील यांनी बोलून दाखवलयं. अर्थात सर्वसामान्य जनतेचा सूर हा तुतारीचा आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता तुतारी हाती घेतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

शरद पवार गटातून जगदाळे-माने इच्छुक ! जगदाळे-शहांची संकटकाळी मदत

सध्या शरद पवार गटातून इंदापूर विधानसभेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे आणि सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने इच्छुक आहेत. लोकसभेच्या निवडणूकीच्या काळात इंदापूर विधानसभेतून खा.सुळे एकाकी पडल्या होत्या यावेळी तटस्त भुमिकेत असलेल्या आप्पासाहेब जगदाळे आणि कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहांनी हजारोंचा लवाजमा घेऊन शरद पवारांच्या गटात प्रवेश केला. इंदापूर विधानसभेतून सुळेंना 26 हजार हून अधिकचं मताधिक्य मिळालं. यात जगदाळे - शहांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शरद पवार संकट समयी आलेल्यांना उमेदवारी देणार का पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढीच्या दृष्टीने हर्षवर्धन पाटलांना जवळ करणार ? की अनपेक्षित डाव टाकणार याची प्रतिक्षा इंदापूरकरांना आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow