भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला फ्रॅक्चर ; व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दरम्यान घटली घटना

Sep 8, 2023 - 17:25
Sep 8, 2023 - 17:56
 0  2669
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला फ्रॅक्चर ; व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दरम्यान घटली घटना

आय मिरर

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला दुखापत झालीय… हर्षवर्धन पाटील यांचा पाय फ्रॅक्चर झालाय याबाबत स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

इंदापूर शहरातील डॉक्टर समीर मगर यांकडे उपचार कामी दाखल होत हर्षवर्धन पाटील यांनी उपचार घेतलेले आहेत.सध्या हर्षवर्धन पाटील यांची प्रकृती ठीक आहे.

या संदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलयं की, आज इंदापूर येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांच्या समवेत व्हॉलीबॉल खेळत असताना पाय घसरून पाय फ्रॅक्चर झाला आहे. डॉक्टरांचा सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत असून मी आपणा सर्वांच्या सेवेत प्रत्यक्ष उपलब्ध नसलो तरी फोनद्वारे मी व माझे कार्यालय आपणास उपलब्ध असेल. आपण काळजी करण्याचे कारण नाही. मी आपणा सर्वांच्या सेवेत लवकरच पुन्हा दाखल होईल. धन्यवाद...!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow