विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलीय - हर्षवर्धन पाटील

Nov 12, 2024 - 08:08
 0  249
विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलीय - हर्षवर्धन पाटील

आय मिरर

इंदापूरात विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे,म्हणून दहशत दमदाटी निर्माण करणं हा शेवटचा प्रयत्न सुरु आहे.पण हा रडीचा डाव आम्ही चालु देणार नाही.असं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

सत्तेतून पैसा पैशातून सत्ता त्यातून गुंडगिरी गुंडगिरीतून दहशत निर्माण करणे त्या दहशतीतून निवडणुकीला मतदान घडवून आणणं अशा प्रकारची पद्धत सुरू झाली आहे.कधीही तालुक्यात संवेदनशील बुथ नव्हते.असलं वातावरण मला कधी पहायला मिळालं नाही.याचा वेळीच कायद्याने वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे.इंदापूर तालुक्यात भयमुक्त वातावरण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

काही ठिकाणी फ्लेक्स फाडले आहेत,सभेला परवानगी दिली जात नाही.याला जनता उत्तर देईल.इंदापूरच्या जनतेने कधी जातीपातीला थारा दिला नाही.मतदार हा राजा आहे ही निवडणूक जनतेच्या हातात गेली आहे.

जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच आभारचं…

सत्तेचा दुरुपयोग चालु आहे आमची सत्ता येणार आहे असं धमकावलं जात आहे.जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच आभारचं मानतो. लोकांमधून आता उद्रेक सुरु आहे कि हे नेते स्वार्थासाठी गेले आहेत.माणसं आता डबल स्पीडने काम करायला लागली.जे गेले त्यांनी स्वत: निर्णय घेतले,जनतेला विचारलं नाही,त्यामुळे मतदार गेला नाही,तो पवार साहेबांसोबत आहे.

उजनी पाच टीएमसी पाणी मंजूरीचा जी आर दाखवा, सत्कार करतो…

मी सत्तेत नाही,सत्तेत ते आहेत.पाच टी एम सी पाणी मंजूर झाले आहे तर त्याचा जी आर दाखवा. पाच टी एम सी पाणी म्हणजे ७५ एकराचं पाणी झाले. फक्त सर्व्हे करण्यासाठी पत्र निघाले होते त्यांच्याच पक्षातील आमदारांनी त्याला विरोध केला मी नाही. मी वारंवार सांगतो आहे की,पाण्याची मंजूरी असेल तर मला मंत्री मंडळाचा जी आर दाखवा मंजूरी असेल तर मी ते जिथे असतील तिथे जावून सत्कार करीन.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow