इंदापूरच्या राजकारणात मोठी घडामोड, प्रवीण मानेंनी घेतली शहा कुटुंबीयांची भेट
आय मिरर
इंदापूरच्या राजकारणातून मोठी बातमी आहे. इंदापूर मधील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी इंदापूर शहरातील शहा कुटुंबाची भेट घेतलीय. मागील आठवडाभरापूर्वीच 3 नोव्हेंबर ला शहा कुटुंबाची शरद पवारांनी भेट घेतली होती, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने भरत शहा मुकुंद शहा नाराज झाले होते आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न स्वत: शरद पवारांनी केला होता.मात्र आज अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी शहा कुटुंबाची भेट घेतली आहे.यावेळी समद भाई सय्यद एडवोकेट सुमित वाघमारे संकेत वाघमोडे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
भरत शहा मुकुंद शहा आणि उमेदवार प्रवीण माने यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. त्यामुळे शहा कुटुंबाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे.
इंदापूर मधील शहा कुटुंब आणि पाटील कुटुंबाचे गेल्या तीन पिढ्यांचे संबंध आहेत. स्वर्गीय खा.शंकररावजी बाजीराव पाटील आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकारणामध्ये शहा कुटुंबाचा मोठा हातभार राहिला आहे.स्वर्गीय गोकुळदासजी शहा हे स्व.खा.शंकरराव पाटील यांचे खांदे समर्थक होते आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष देखील राहिले आहेत. तर भरत शहाहे करमुकेशन कराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत भरत शहा यांच्या भाऊजाई इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिले असून इंदापूर शहरात शहा कुटुंबाचे मोठे राजकीय प्रस्त आहे.
दिनांक ३ नोव्हेंबर 2024 रोजी शहाणी पाटील कुटुंबातील राजकीय वाद मिटवण्यासाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेतला होता मात्र आठवडाभरानंतर ही शहा कुटुंब हर्षवर्धन पाटलांसोबत सक्रिय दिसलं नाही यावरून या दोन्ही कुटुंबातील असणारे राजकीय मतभेद कायम असल्याचा दिसून येत आज प्रवीण माने यांनी शहा कुटुंबाची भेट घेतल्याने आणि बंद दारावर चर्चा झालं ना शहा कुटुंब नेमका कोणती राजकीय भूमिका घेणार ? की शहा कुटुंब माने यांच्या गळाला लागणार याची चर्चा आता जोरदारपणे रंगली आहे.
What's Your Reaction?