जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा ! हिंदु समाज बांधव आक्रमक,वालचंनगर पोलीसांना दिले निवेदन 

Jan 5, 2024 - 17:16
 0  623
जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा ! हिंदु समाज बांधव आक्रमक,वालचंनगर पोलीसांना दिले निवेदन 

आय मिरर

सकल हिंदुंचे आराध्य दैवत प्रभु श्री राम यांचा अपमान करून धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील विविध गावातील हिंदु समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शुक्रवार दि.०५ जानेवारी रोजी वालचंदनगर पोलीसांना या मागणीचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान इंदापूर बारामती मार्गावर वालचंदनगर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला काळे फासत जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दि. 03 जानेवारी २०२४ रोजी शिर्डी येथे सुरू असलेल्या शिबीरात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांबद्दल जाणीवपूर्वक अपमानास्पद वक्तव्य करून सकल हिंदुंच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत व जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण केलेली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करून कायदेशिर कार्यवाही करावी असं या निवेदनात म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow