आम्ही वीस वर्षात काय केलं ते जनता ठरवेल,आता तुमचा हिशोब करण्याची वेळ आलीय - हर्षवर्धन पाटलांचे आ.भरणेंवर टीकास्त्र

Feb 22, 2024 - 08:21
 0  601
आम्ही वीस वर्षात काय केलं ते जनता ठरवेल,आता तुमचा हिशोब करण्याची वेळ आलीय - हर्षवर्धन पाटलांचे आ.भरणेंवर टीकास्त्र

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूरचे लोकप्रतिनिधी प्रत्येक जाहीर सभेत आमच्यावरती आगपाखड करतात, वीस वर्षात आम्ही काय केलं अशी टीका आमच्यावरती करतात,मात्र आमचा वीस वर्षाचा हिशोब मागण्यापेक्षा तुम्ही दहा वर्षात काय केलं? एक नया पैसा इंदापूर तालुक्यात आला का? एक नया उद्योग इंदापूर तालुक्यात आला का ? किती युवकांच्या तरुणांच्या हाताला आपण रोजगार दिले याचा हिशोब द्या असा जाहीर सवालच हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना विचारला आहे. वीस वर्षात आम्ही काय केलं हे जनता ठरवेल आणि येणारा काळच सर्व काही सांगून जाईल असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटल आहे.

इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं.2 येथे बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 कोटी 82 लाखांच्या विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजने हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पार पडली.यावेळी जाहीर सभेला संबोधन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले की,वीस वर्षाचा आमचा हिशोब मागण्यापेक्षा तुमचा दहा वर्षाचा हिशोब द्या,आपण या दहा वर्षात एक तरी अल्पसंख्यांक माणसाला नोकरी लावली का? एक तरी सहकारी संस्था काढली का ? एक तरी व्यवसाय तालुक्यात आणला का ? याचा हिशोब आधी जनतेला द्या आणि मग आमची मापं काढा.

1952 पासून 2014 पर्यंत इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास झाला.तालुक्यात बंधारे, रस्ते महावितरणची मोठ्या प्रमाणात कामे झाली.आता विरोधकांचा हिशोब करण्याची वेळ आली असून सोलापूर जिल्ह्यात तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,तहसील कार्यालय, रेशन दुकानात कशा पद्धतीने नाव घेतले जाते हे एकदा तपासून पहा असे म्हणत त्यांनी आमदार भरणे यांच्यावर टीका केली.

आमचा कार्यकर्ता आपला फटका असेल त्याला नसेल एखाद्या कामाचा ठेका मिळाला. परंतु आपला कार्यकर्ता तत्त्वाने व स्वाभिमानाने लढणारा कार्यकर्ता आहे, गेली दहा वर्षे सत्ता नसतानाही तो प्रमाणिकपणे आमच्या सोबत राहिला.आगामी निवडणुकीत अशीच साथ द्या असे आवहन करीत तालुक्यात परिवर्तन होणार असल्याचे पाटील म्हणाले.

यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार, निरा भिमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, माजी सभापती विलास वाघमोडे, कर्मयोगी कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे, भाटनिमगावचे सरपंच अजित खबाले, गोपीचंद गलांडे बाळासाहेब मोरे, कैलास कदम,महेश शिर्के, अमोल इंगळे, गावचे सरपंच,उपसरपंच,सोसायटीचे चेअरमन व संचालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow