हर्षवर्धन पाटील यांची ही पोस्ट वेधून घेतेय नेटकऱ्यांचे लक्ष ! वाचा काय लिहलयं त्या पोस्टमध्ये

Feb 1, 2024 - 08:36
 0  1118
हर्षवर्धन पाटील यांची ही पोस्ट वेधून घेतेय नेटकऱ्यांचे लक्ष ! वाचा काय लिहलयं त्या पोस्टमध्ये

आय मिरर(देवा राखुंडे)

राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांचा आज वाढदिवस आहे.या निमित्तानं आपल्या लाडक्या लेकाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियातून फेसबुक वरती एक पोस्ट करत आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या या पोस्टमध्ये काय म्हटलंय ? 

आज चिरंजीव राजवर्धनचा वाढदिवस, 

सर्वात आधी Rajhwardhan Patil दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

घरात तू सर्वात लहान मात्र सर्वांची काळजी घेण्यात तत्पर, लहानपणापासून तू घरातील सर्वांचा लाडका. घरातील सर्वांशी एकरूप राहून कधी मोठा झाला समजलं देखील नाही. मी राजकीय क्षेत्रात असल्याने पुरेसा वेळ दिला नसला तरी तू मात्र शिक्षण पूर्ण करून आता घरातील समाजकारणाची परंपरा पुढे घेऊन जात आहेस, हे बघून मन भरून येतं.      

लहान असताना अंगाखांद्यावर खेळणारा तू कधी तमाम लोकांच्या मनात जाऊन बसला हे समजलं देखील नाही. यामागे तुझे खूप कष्ट आहेतच. सकाळी लवकर उठल्यापासून तू रात्री उशिरापर्यंत जनतेची सेवा करत असतो.      

तरुणांपासून ते जेष्ठांपर्यंत तुझ्याबाबत तुझ्या कामाबाबत जे शब्द कानावर पडतात ते ऐकून एक वडील म्हणून आयुष्य सार्थकी लागल्यासारखा जाणवतं. सतत लोकांच्यामध्ये, रमून तू काम करतो. विद्यार्थ्यांची कामे असतील, शेतकऱ्यांची कामे असतील, तरुण दूध उत्पादकांची कामे असतील, यासाठी तू तत्पर असतो.       

कोणाच्या आनंदात, कोणाच्या दुःखात तू असतोच असतो. कुटूंबातील सर्वांचा लाडका आणि सर्वांची काळजी घेणारा तू आता संपूर्ण तालुक्यालाच माझं कुटूंब मानतो. ही खरंच एक वडील म्हणून अभिमानाची बाब आहे.      

सध्या तालुक्यातील राजकीय वातावरण वेगळंच झालं आहे. पण तू त्याचा क्वचितही डाग अंगाला लावला नाहीस, अगदी प्रामाणिकपणे तू तुझं काम करतच असतो. हे सांगताना वडील म्हणून माझी छाती फुगून येते. आणि याच गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. माझी ओळख म्हणून तू कधी काम केलं नाही, तुझ्या हिमतीवर तू माणसं कमावली.        

अनेक अडचणी आल्या पण एकदाही त्याचा वाव तू केला नाही. तुझ्या कामाची पद्धत कशी असते हे रोज भेटणाऱ्या लोकांकडून समजतं. तेव्हा वाटतं एक बाप म्हणून मी हेच कमवलं आहे. तुझ्यामुळे अनेकांची कामे मार्गी लागतात, लोकांच्या चेहेऱ्यांवर समाधान दिसतं, हेच मी आयुष्यात कमवलं आहे. एक वडील म्हणून हा दागिना आहे, जो आयुष्यभर असाच चमकत राहणार आहे.      

इथून पुढे देखील तू असाच जनसेवा करत राहशील, याच कसलीच शंका नाही. तुला उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow