राजवर्धन हर्षवर्धन पाटील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

Feb 1, 2024 - 07:51
Feb 1, 2024 - 07:55
 0  151
राजवर्धन हर्षवर्धन पाटील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

आय मिरर(देवा राखुंडे) 

हजरजवाबीपणा हा बुद्धी चातुर्याचा गुण राजदादांकडे असल्यामुळे तल्लख विलक्षण बुद्धीमत्तेने समोरच्या व्यक्तीच्या मनात अल्पावधीच आपले स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही प्रसंगात मिश्किल विनोदी शैली त्यांच्या वाणीत पहावयास मिळतात. नेतृत्व करायला वय लागत नाही, लागत ते साहस, बुद्धी, चातुर्य आणि निर्णय क्षमता..! हे दादांच्या बुद्धीचातुर्ययातून सहज दिसून येते. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वास प्रथम उदंड दीर्घायुष्य मनःपूर्वक शुभेच्छा…

प्रभुता - 'लघुता में प्रभुता' या वचनाप्रमाणे आबाल वृद्धांमध्ये लहान होऊन त्यांच्याशी प्रेमाचा संवाद सधाणारे दादा, लहान मुलांना ते आपले दादा वाटतात. कित्येक वेळा सामाजिक कार्य करत असताना अनेक लहान मुलांना सहजच उचलून घेतात, त्यांच्या आग्रहस्तव त्यांच्याबरोबर फोटो ही काढतात. लहान होऊन सर्वांना आनंद देणारे युवा नेतृत्व ईश्वरीय प्रभुत्वाचे धनी वाटतात. प्रभावीत करण्याची कला व क्षमता यांचा अनोखा संगम याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजवर्धन पाटील!

व्यवसायिकता - सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना व्यवसायिक दृष्टिकोन समोर ठेवून खाजगी व सहकारी संस्था ही चांगल्या प्रकारे चालाव्यात यासाठी अहोरात्र कष्ट करताना, जनहित समोर ठेवून दूर दृष्टीने आपल्या उच्च शिक्षणाचा ठसा व्यावसायिक क्षेत्रात उमटवताना राजवर्धन दादा आपणस दिसून येतात. एका निष्णात व्यवसायिकाचं दर्शन त्यांच्या व्यक्तिमत्वातून पहावयास मिळते.

कार्यसातत्य - कोणतेही काम हातात घेतले की त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण होईपर्यंत न थांबणाऱ्या व्यक्तीमध्ये राजवर्धन दादांचे कार्य सातत्य नेहमीच लोकांना प्रभावित करते. त्यामुळे कोणतेही काम दादांकडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना आपले काम पूर्ण होणार याची खात्रीच वाटते.

समाजाभिमुख व्यक्तीमत्व -  सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा हा कर्मयोगी कै. शंकररावजी पाटील व आदरणीय हर्षवर्धन पाटील यांच्याकडून दादांना लाभलेला आहे. समाजातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी शाश्वत उपाययोजना करण्याकडे त्यांचा कल असतो तात्पुरती मदत ही ठराविक काळासाठी असते आणि शाश्वत उपाय योजना ही एखाद्या अडीअडचणीचे समाधान असते. हा विचार वारशामुळेच मिळाल्या कारणाने समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख इंदापूर तालुक्याला आणि सहवासातील मित्र परिवारांना झाल्याशिवाय रहात नाही.

सुसंस्कृतपणा - विचारांची उंची ही सुसंस्कृतपणावरतीच अवलंबून असते, हा गुण संस्कारांनी निर्माण होतो. आपले उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये घेऊनही तेथील इंग्रजी संस्कार घेतले नाहीत, खानदानी संस्काराचे दर्शन दादांच्या वागण्या बोलण्यातून नेहमीच जाणवते आणि संस्कार क्षम पिढी निर्माण होण्यासाठी अशा सुसंस्कृत व्यक्तीची गरज समाजाला असते. ती गरज दादांसारख्या व्यक्तीमुळे पूर्ण होते.

विवेकशीलता - सामाजिक जीवनात काम करत असताना विवेकशीलतेला खूप महत्त्व आहे. कोणताही सामाजिक निर्णय घेत असताना निरपेक्ष विवेकी निर्णय घ्यावा लागतो. ज्यामुळे कोणावरही अन्याय होत नसतो. दादा कोणताही निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक विचार करून घेतात त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा विवेकशीलतेचे दर्शन घडवतो.

परिपक्व विचार - विचारांचं बाळकडू हे पाटील परिवारात मिळाल्यामुळे अगदी कोणत्याही विषयावरती त्यांचे विचार हे अभ्यासू, परिपक्व आणि सामाजिक बांधिलकी जपणारे वाटतात.

सहकार क्षेत्रातील कार्य - सहकाराचे जाळे इंदापूर तालुक्यात निर्माण करण्याचं श्रेय हे कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील आणि हर्षवर्धनजी पाटील यांना जाते. सहकार टिकवण्यासाठीचे प्रयत्न पाटील परिवाराने अविरत केलेले आहे. वारसा आणि वसा घेऊन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राजवर्धन दादा यांचे कार्य मोलाचे आहे. सहकारी साखर कारखानदारी ही शासनाच्या धोरणावरती अवलंबून असते परंतु नियोजन पूर्वक उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांना न्याय देण्याचं काम राजवर्धन दादा यांच्या माध्यमातून होत आहे. तसेच दूधगंगा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न दिसतो, या दोन्हीही संस्थात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सहकाराला संजीवनी देण्याचं काम त्यांच्या रूपाने होत, असून इंदापूर तालुक्यातील सहकार रहावा म्हणून अविरत कष्ट करण्याची तयारी उपजतच दादांना लाभली आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि एस बी पाटील सारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो, या संस्था विद्यार्थी कल्याणसाठी कशा काम करतील आणि नवीन शैक्षणिक धोरणासाठी या कशा तयार होतील, याचे बारकावे ते नेहमी प्रशासनाला सांगत असतात, त्या दृष्टीने कृती करण्याची गरज लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रातही आपले योगदान देतात, समाजासाठी सहकार असतो आणि तो सहकार आपल्याला मिळालेल्या पदांवर ती काम करून वाढवावा लागतो याचे उत्तम उदाहरण हे राजवर्धनदादा पाटील आहेत.

राजकीय क्षेत्रातील कार्य - भाजप युवा मोर्चा कोअर कमिटी, संचालक निरा भिमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर या पदांवरती कार्य करत असताना तरुण युवकांमध्ये राजवर्धन दादांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा पाहावयास मिळतो. समाजकार्यातून राजकारण करणारी ही व्यक्ती असल्यामुळे समाज मनावरती त्यांच्याबद्दल आदर आणि मैत्रीच्या भावना संपूर्ण इंदापूर तालुकाभर पाहावयास मिळतात. त्यांचा मित्रपरिवार हा इंदापूर तालुक्याच्या सीमा पार करून संपूर्ण पुणे जिल्ह्यात पाहावयास मिळतो, कोअर कमिटीच्या माध्यमातून अनेक तरुण सहकार्याना बरोबर घेऊन त्यांच्या व समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम त्यांच्या हातून होते आहे. याचा सार्थ अभिमान या इंदापूरच्या सामान्य जनतेला व भूमीला आहे.

अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील कार्य - धर्म हा वागणूक शिकवणारा असतो. धर्म म्हणजे वागण्याची पद्धत. कोणत्याही समाजाचा धर्म हा त्यांच्यात चांगल्या वागणुकीसाठी प्रसिद्ध असतो. त्या दृष्टीने राजवर्धन दादा पाटील हे, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त समारंभांना आवर्जून जातात, महापुरुषांच्या कार्याचा वसा आणि वारसा तरुणांनी कसा घ्यायचा, या संदर्भात मार्गदर्शन करतात, राष्ट्रीय सण, उत्सवाच्या वेळी समाजात देशभक्ती वाढावी म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये आवर्जून आपली उपस्थिती दाखवतात. तसेच धार्मिक सण समारंभाच्या वेळी म्हणजेच गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी उत्सव या काळात अनेक मंडळांना भेटी देऊन आर्थिक मदतही मोठ्या प्रमाणावर करतात. गावाकडील यात्रांच्या वेळी पैलवान आखाड्यामध्ये शरीर स्वास्थ्य जपलेल्या पैलवानांच्या कामगिरीचं तोंड भरून कौतुक करताना पाहावयास मिळतात. तालुक्यात असणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या वेळी स्वतः गाडा हाकून बैलगाडा शर्यतीच्या वेळी उत्साह निर्माण करण्याचं काम ते करत असतात, गाव यात्रांच्या वेळी ग्रामदैवतांना मानवंदना करण्यासाठी आणि एकंदरीतच यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होत नाही ना हे आवर्जून पाहत असतात. धार्मिक क्षेत्रामध्ये नवयुकांचे योगदान काय आहे. हे दादांच्या रूपाने आपणास दिसते.

एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय युवा नेतृत्त्व यांचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात राजवर्धन दादा यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील हर्षवर्धन पाटील यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वतःच्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवण ही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

किसी मक्सद के लिए खड़े हो तो, एक पेड की तरह गिरे भी तो बीज की तरह, ताकि दुबारा उगकर, उसी मक्सद के लिए जंग कर सके..

अशाच मानसिकतेत ज्यांचे समाजाप्रति कार्य सुरू असणारे युवा नेतृत्त्व म्हणून राजवर्धनदादा यांची ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, सामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करताना, त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य आणि शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून राजवर्धनदादा यांनी सर्वसामान्य युवा वर्गात नावलौकिक मिळवला आहे, या सर्व बाबींची म्हणून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या राजवर्धनदादा यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! - प्रा.एस.बी.देवकर 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow