देशाच्या मंत्र्याला स्वतःच्या मुलीसाठी पोलीस ठाण्याला जावं लागतं हे दुर्दैवी - हर्षवर्धन पाटील

आय मिरर
जळगाव मध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे. त्याहीपेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या मुलीच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं आहे. या घटनेची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतीत गृह खात्याने अधिक लक्ष घालावं. पोलीस वर्दीचा वचप दरारा असायला हवा, त्यावर कायदा सुव्यवस्था अवलंबून आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी जळगाव येथील घटनेवरून राज्य सरकारचे कान टोचले आहेत.
स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेच्या नंतर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर बस स्थानकाला भेट देत त्या ठिकाणच्या सुरक्षेची आणि स्वच्छतेची माहिती घेतलीय. हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला आहे.
यावेळी इंदापूर बस स्थानकाचे आगर व्यवस्थापक हनुमंत गोसावी, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्निल सावंत,दादासाहेब पिसे, अविनाश कोथमीरे,माजी नगरसेवक शेखर पाटील, एडवोकेट शरद जामदार, हमीद आतार,अमोल खराडे,कपिल पाटील,अमर लेंडवे,गणेश रोडे,अमोल कारंडे,गणेश कांबळे,मनोज काळे, दत्ता पांढरे, माऊली चौधरी आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर बस स्थानकात उपस्थिती लावत त्या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी केली. बस स्थानक स्वच्छता सुरक्षा व्यवस्था कशी आहे याचा आढावा हर्षवर्धन पाटील यांनी घेतला. शाळकरी विद्यार्थिनी आणि प्रवाशांची संवाद साधत तुमच्या काही अडचणी आहेत का याचीही विचारणा केली. बस स्थानकातील फलाटवर उभ्या असलेल्या बसेस मध्ये जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी बसेसची पाहणी करत प्रवाशांना काही अडचणी आहेत का याचा आढावा घेतला. इंदापूर आघार व्यवस्थापक हनुमंत गोसावी यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर बस स्थानकातील सोयी सुविधा यांबाबत माहिती दिली.
इंदापूर बस स्थानक हे अत्यंत रहदारीचे ठिकाण आहे. पुणे मुंबई ठाणे यासारख्या मोठ्या शहरातून मराठवाडा कर्नाटकाकडे जाणाऱ्या अनेक बसेस या ठिकाणावर थांबतात त्यामुळे प्रवाशांची मोठी रहदारी या ठिकाणी असते. तर बस स्थानकाच्या जवळच कॉलेज आणि हायस्कूल असल्याने विद्यार्थिनी मोठ्या संख्येने बस स्थानकावर असतात.स्वारगेट घटना पाहता खबरदारी म्हणून इंदापूर बस स्थानकात दिवसा महिला पोलीस रक्षकाची नियुक्ती करावी अशा सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी पोलीस विभागाला दिल्या.
तर काही प्रमाणात स्थानकात अस्वच्छता दिसत असून आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ बस स्थानक आणि नगर परिषदेने या ठिकाणी स्वच्छतेवरती भर द्यावा आणि ठोस उपाय योजना राबवाव्यात अशा सूचनाही हर्षवर्धन पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
गाळे धारकांनी वाचला हर्षवर्धन समोरच तक्रारींचा पाढा....
दरम्यान बस स्थानकातील गाळेधारकांनी त्यांना होत असलेल्या दैनंदिन त्रासाबद्दल हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे तक्रार मांडली. तळमजल्यातील ड्रेनेज लाईन गेल्या पाच सात वर्षापासून बंद आहे. 2020 साली पुढील ड्रेनेज लाईन ब्लॉक असल्यामुळे तळमजल्यात चार ते पाच फूट पाणी साच्चले होते त्यामुळे सर्व दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आता बस स्थानकातील रोडचे व ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे त्यातच तळमजल्यातील ड्रेनेज लाईन नवीन टाकून घ्यावी किंवा साफ करून घ्यावी. शिवाय बस स्थानकातील व्यापारी गाळ्यांसमोर लावल्या जाणाऱ्या बॅनरमुळे गाळेधारकांना त्रास होत आहे. लाखो रुपये गुंतवण या ठिकाणी व्यापाऱ्याने गाडी विकत घेतले आहेत त्याकरता बस स्थानकासमोरील क्षेत्र हे बॅनर निषेध क्षेत्र करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.
बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवा - प्रवाशांची मागणी...
शिवाय बस स्थानक आवारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असून ही अतिक्रमणे देखील तात्काळ हटवण्यात यावीत अशी मागणी ही यावेळी प्रवाशांनी प्रशासनाकडे केली. यावर आगार प्रमुख गोसावी यांनी नगरपरिषद आणि पोलीस खात्याच्या मदतीने ही अतिक्रमणे तात्काळ हटवली जातील असे आश्वासित केले.
प्रत्येकाने आपली नैतिकता तपासून घ्यावी, मुंडेंच्या राजीनाम्यावरून हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
सार्वजनिक जीवनात काम करताना प्रत्येकाने काही पथ्य पाळले पाहिजे. सामाजिक भान ठेवले पाहिजे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. बीड आणि परभणीत घडलेल्या घटना खेदजनक आणि निंदणी आहेत. अधिवेशनात सभागृहात हे विषय चर्चिले जातील. पण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे या राज्यात अशा घटना घडल्यानंतर प्रत्येकाने आपली नैतिकता तपासून घ्यावी. आम्ही वीस वर्षे मंत्रिमंडळात होतो अशा काही घटना घडल्यानंतर तात्काळ त्यावेळीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यांनी काय करावा हा त्यांचा प्रश्न आहे असा हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
तर सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडू नये...
आज राज्यपालांच अभिभाषण झाल. आठ किंवा नऊ तारखेला अर्थसंकल्प मांडणार आहेत त्यात काय काय येतेय पाहू. जी काही आश्वासन लोकांना निवडणुकीत दिली होती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही कायम देऊ या सर्वांचं काय होतंय ते बघूया अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी अर्थसंकल्पावरून दिली आहे.
योगेश कदम यांच्या वक्तव्याचा हर्षवर्धन पाटलांकडून निषेध...
योगेश कदम यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. सरकारमधील एखाद्या मंत्र्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे चुकीच आहे. त्याचा खुलासा त्यांनी केला.खुलासा करणे हा भाग वेगळा पण असं वक्तव्यच करायला नको होतं. आशा सेन्सिटिव्ह घटनेत काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं तारतम्य ठेवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी योगेश कदम यांच्यावती निशाणा साधला आहे.
What's Your Reaction?






