त्याने एक नाही तब्बल पाच दुचाकी चोरल्या अन् पडक्या खोलीत लपवल्या ! दौंड पोलिसांनी आकाश पातळ एक करून सगळ्याच बाहेर काढल्या

आय मिरर
दौंड पोलीस ठाण्यासमोरील प्रदीप प्लाझा परिसरातून भर दिवसा दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. अमजद गफूर खान या बावीस वर्षीय आरोपीला नेहरूनगर परिसरातून चोरलेल्या दुचाकी दुचाकीसह ताब्यात घेण्यात आलय. त्याच्याकडून पाच दुचाकी ही जप्त करण्यात आल्यात. अमजद गफूर खान यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये देखील वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दौंड पोलिस ठाण्यासमोरील प्रदीप प्लाझा ते सेंट्रल बैंक शाखेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून २० फेब्रुवारी रोजी भरदिवसा तुषार संदीप भागवत यांच्या दुचाकी वाहनाची चोरी झाली होती. तुषार भागवत यांनी या प्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती.
पोलिस ठाण्यासमोरूनच वाहन चोरीस गेल्याने पोलिसांनी या गुन्ह्याची तपासाची चक्र वेगाने फिरवली. तपासा दरम्यान अमजद गफूर खान (वय २२, रा. नेहरू चौक परिसर, दौंड) याच्याकडे तुषार भागवत यांची चोरलेली दुचाकी व अन्य चार वाहने मिळून आले.
अमजद खान याने नेहरू चौक परिसरातील चार पडक्या खोल्यांमध्ये ही चोरीची वाहने लपविली होती. पोलिस पथकाने तेथून तुषार भागवत यांची चोरीस गेलेली हिरो होंडा कंपनीची सीडी डीलक्स आणि दौंड शहरातील रेल्वे कर्मचारी रवी लक्ष्मण कांबळे यांची ८ जानेवारी रोजी चोरीस गेलेली होंडा कंपनीची एचएफ डीलक्स मॉडेल असलेली दुचाकी जप्त केली. त्याचचरोवर नोंदणी क्रमांक नसलेली हिरो कंपनीची हंक, होंडा डिओ आणि हिरो कंपनीची पॅशन प्रो मॉडेल, ही तीन दुचाकी वाहने जत केली आहेत.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रूपेश कदम, हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, किरण राऊत व अमीर शेख यांच्या पथकाल ही कामगिरी केली.
What's Your Reaction?






