अजित पवारांना सहकार्य करायचं का नाही ? शुक्रवारी हर्षवर्धन पाटील पाडणार कांडका ; कळस आणि निमगांवातील कार्यकर्ता मेळाव्यात घेणार निर्णय

Feb 28, 2024 - 08:07
 0  1232
अजित पवारांना सहकार्य करायचं का नाही ? शुक्रवारी हर्षवर्धन पाटील पाडणार कांडका ; कळस आणि निमगांवातील कार्यकर्ता मेळाव्यात घेणार निर्णय

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूरमध्ये भाजप ॲक्शन मोड वरती आली आहे.हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कळस आणि निमगांव केतकी मध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे होणार असून या मेळाव्यात आगामी लोकसभेला महायुती मधील घटकपक्ष असणाऱ्या अजित पवार यांना सहकार्य करायचे की नाही याचा निर्णय हर्षवर्धन पाटील घेणार आहेत.भाजप कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार असून आगामी निवडणुकांची रणनीती यात ठरवली जाणार आहे.त्यामुळे आत्तापासूनचं भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

"संकल्प 2024 संकल्प विजयाचा अभियान" या टॅगलाईनखाली इंदापूर तालुक्यातील कळस-वालचंदनगर गटाचा जंक्शनला तर निमगाव-निमसाखर गटाचा निमगावला शुक्रवारी मेळावा होणार आहे. यात आगामी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या धरतीवर मोठे निर्णय होणार आहेत.शुक्रवारी (दि.1) कळस-वालचंदनगर गटातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा जंक्शन येथे 4 वा., तर निमगाव-निमसाखर गटाचा मेळावा निमगाव केतकी येथे सायंकाळी 6.30 वा. आयोजित करण्यात आला आहे.

संकल्प 2024 संकल्प विजयाचा या अभियानांतर्गत जंक्शनचा मेळावा रोहित मंगल कार्यालयात तर निमगाव केतकीचा मेळावा संत सावता माळी मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या मेळाव्यांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अन्य भाजप नेते मार्गदर्शन करणार आहेत. तरी भाजपचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केले आहे.

भाजप कार्यकर्ते ॲक्शन मोड वर...! भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी ॲक्शन मोडवर राहावे, असे आवाहन भाजप नेते हर्षवर्धन पाटील सातत्याने करीत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow