एल.जी.बनसुडे विद्यालयात मराठी राजभाषा दिनी पार पडले विविध उपक्रम
आय मिरर(देवा राखुंडे)
पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयात (दि.२७)रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर मराठी साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज)यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इयत्ता ६ वी ते ११ वी निबंध स्पर्धा,कविता वाचन स्पर्धा तसेच इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करून या दिनी मराठी राजभाषेचा गुणगौरव करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक हनुमंत बनसुड,उपाध्यक्ष शितल कुमार शहा,कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, सचिव नितीन बनसुडे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून प्राचार्या वंदना बनसुडे यांनी मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संबोधित केले.वैभव काळे व सुनील बांडे यांनी मराठी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापक राहुल वायसे,सर्व विभाग प्रमुख,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले व आभार सीमा बाराते यांनी मानले.
What's Your Reaction?