आ.भरणेंच्या हस्ते आज कळंबमध्ये पार पडणार 102 कोटी 70 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन,सणसर मधील विरोधकांच्या टीकेला आ.भरणे काय उत्तर देणार? लागली नजर

Mar 10, 2024 - 12:00
 0  398
आ.भरणेंच्या हस्ते आज कळंबमध्ये पार पडणार 102 कोटी 70 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन,सणसर मधील विरोधकांच्या टीकेला आ.भरणे काय उत्तर देणार?  लागली नजर

आय मिरर(देवा राखुंडे)

माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणेंच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कळंब ग्रामपंचायत अंतर्गत 102 कोटी 70 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आज रविवारी दि.10 मार्च रोजी पार पडणार असून याच ठिकाणी सायंकाळी सातच्या सुमारास आ.भरणे यांची जाहीर सभा होणार असून शनिवारी 9 मार्च रोजी इंदापूर तालुक्यातील सणसर येथे हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांचं नाव न घेता केलेल्या टीकेला आमदार भरणे काय उत्तर देणार याकडे आत्तापासूनच तालुक्याची नजर लागली आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती कारखान्याचे व्हॉ. चेअरमन अमोल पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, मा. सभापती दत्तात्रय फडतरे, पंचायत समिती मा. सदस्य सुहास डोंबाळे, ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, वालचंद विद्यालय कळंब चे चेअरमन रामभाऊ कदम, युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शुभम निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इकबाल शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कळंब गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow