इंदापूरच्या निमगांव केतकीत बंदला शंभर टक्के प्रतिसाद
आय मिरर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालाना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मराठा समाजातील आंदोलकावर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवून तसेच निषेध सभा घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी सकल मराठा समाज निमगाव केतकी यांच्यावतीने सोमवारी निमगाव बंदची हाक देण्यात आली होती. त्याला सोमवारी ग्रामस्थांनी शंभर टक्के दिवसभर गाव कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद देत या घटनेचा निषेध व्यक्त केला.यावेळी ओबीसी बांधव तसेच बहुजन मुक्ती पार्टी यांच्यावतीने या बंदला पाठिंबा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.
What's Your Reaction?