राष्ट्रवादीकडून सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत होणार आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण - जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती

Sep 2, 2023 - 16:24
 0  250
राष्ट्रवादीकडून सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीत होणार आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण - जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती

आय मिरर

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. "शिक्षक" हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.या दिवसाचे औचित्य साधून सोमवार दि. 04 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यातील बी जे रोडवरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य सभागृहात दुपारी 1 वाजता आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण ल,इंदापूर विधानसभेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे खेड, विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण यांच्या वतीने या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचाही कार्यक्रम होणार आहे. सर्व पदाधिकारी यांनी आपल्या समर्थकांसह मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहनही जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow