यशस्विनी वुमन मोटार सायकल रॅलीचे इंदापूरात उत्साहात स्वागत
आय मिरर
बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेतंर्गत केंद्रीय राखीव पोलिस दलामार्फत महिलांच्या काढण्यात आलेल्या "यशस्विनी" या वुमन बाईक रॅलीचे इंदापूर मध्ये महिला व बाल विकास विभागाकडून उत्साहात स्वागत करण्यात आलेय.दरम्यान महामार्ग पोलीसांसह इंदापूर आणि भिगवण पोलीसांनी कडेकोट सुरक्षा बजावत ही रॅली पुढे मार्गस्थ केलीय.
राष्ट्रीय एकता दिवसाच्या अनुषंगाने सी.आर.पी.एफ कडून सोलापुर ते नाशिक वुमन मोटार सायकल रॅली काढण्यात आली आहे.०५ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान बाईक रॅली पार पडणार असून सोलापूर वरून प्रस्थान झालेली ही महिलांची तुकडी दुचाकीवरून नाशिक येथे जाणार आहे. आज गुरुवारी दि.१९ आँक्टोंबर रोजी ही रॅली इंदापूर मध्ये दाखल झाली. दुपारी इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी येथील शिवशंभो पॅलेस आणि भिगवण मध्ये महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद पुणे यांकडून या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
या वुमन मोटार सायकल रॅलीत ७५ महिला अधिका-यांसह सहभागी झाल्या होत्या. त्या महिला बाइकर्स विविध ठिकाणी किशोरवयीन मुली,शाळा कॉलेजमधील विद्यार्थी,अंगणवाडी कर्मचारी, एनसीसी कँडेटस इत्यादींशी संवाद साधून महिला सशक्ती करणाबाबत संदेश देणार आहेत.
ही बाईक वुमन रॅली सोलापूर वरून पुणे जिल्ह्यात प्रवेश करताच हिंगणगाव येथील सीमारेषेवरून स्वामी चिंचोली पर्यंत पोलिसांकडून सुरक्षा बजावण्यात आली.यात इंदापूर पोलीस ठाण्याच्या वाहनासह कर्मचारी आणि इंदापूर पोलीस मदत केंद्राचे वाहनासह पोलीस उप निरीक्षक महेश कुरेवाड.पो.हवा.नितीन राक्षे, उमेश लोणकर, पो.काँ.तानाजी लोंढे यांनी सुरक्षा बजावली. पुढे भिगवण मध्ये दाखल होताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उप निरीक्षक रुपेश कदम यांसह कर्मचारी वर्गाने सुरक्षा बजावत ही रॅली पुढे मार्गस्थ केली.
What's Your Reaction?