डिकसळच्या योगेश्वरी विविध कार्य. सोसायटीच्या महिला संचालिका जयश्री हगारे यांचा राजीनामा ; हे आहे कारण 

Oct 30, 2023 - 11:43
 0  287
डिकसळच्या योगेश्वरी विविध कार्य. सोसायटीच्या महिला संचालिका जयश्री हगारे यांचा राजीनामा ; हे आहे कारण 

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूरच्या डिकसळ येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सोसायटीच्या महिला संचालिका जयश्री चंद्रकांत हगारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.मराठा व धनगर समाजाला राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी विलंब करत आहे याचा निषेध करण्यासाठी हगारे यांनी हे पाऊल उचलले आहे.

जयश्री हगारे या गेली एक वर्षापासून संचालिका म्हणून काम करत आहेत. राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात आंदोलने सुरू आहेत. गेल्या साठ वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे मात्र अद्याप पर्यंत सरकारने यावरती ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे व्यथीत होऊन मी आपल्या संचालिका पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे असं त्यांनी नमूद केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow