इंदापूर बाह्यवळणार दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अपघात ; दुचाकीस्वाराचा मृत्यू

Dec 26, 2023 - 07:14
 0  1148
इंदापूर बाह्यवळणार दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून अपघात ; दुचाकीस्वाराचा मृत्यू

आय मिरर (देवा राखुंडे)

इंदापूर बाह्यवळणार महात्मा फुले चौक परिसरात दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ चाजण्याच्या सुमारास घडली.विजय पांडू चव्हाण वय 39 वर्षे सध्या रा. चाकण पुणे मुळ रा. तांडा नाविंदगीगांव ता. अक्कलकोट जि.सोलापुर असं मयत व्यक्तीचं नांव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,विजय पांडू चव्हाण आणि त्याचा मोठा भाऊ राजु पांडू चव्हाण हे दोघे होंन्डा कंपनीच्या दुचाकी क्रमांक MH 12 TX 8356 वरुन प्रवास करीत होते.विजय चव्हाण हा दुचाकी चालवत होता तर राजु हा पाठीमागे बसला होता. इंदापूर बाह्यवळणार आले असता विजयचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्यावर घसरली गेली. दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. 

या अपघातात विजय चव्हाण याच्या डोक्याला, उजव्या पायाच्या नडगीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.सदर गुन्ह्याचा तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. जाधव करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow