इंदापूर तालुका प्रा. शिक्षक पथसंस्थेच्या सभापती पदी सतीश दराडे तर उपसभापतीपदी संतोष गदादे यांची निवड

Dec 26, 2023 - 07:05
 0  667
इंदापूर तालुका प्रा. शिक्षक पथसंस्थेच्या सभापती पदी सतीश दराडे तर उपसभापतीपदी संतोष गदादे यांची निवड

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सभापती निवडीची बैठक सोसायटी सभागृहामध्ये संपन्न झाली.त्यामध्ये बिनविरोध सतीश दराडे यांची सभापती पदी निवड झाली व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांची बिनविरोध उपसभापतीपदी निवड करण्यात आली. तसेच तज्ञ संचालक म्हणून भोईसर व सहदेव काशीद यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे प्रमुख नानासाहेब नरुटे, प्रशांत भिसे, कैलास वनवे यांचे सह दत्तात्रय तोरस्कर माजी चेअरमन आदिनाथ धायगुडे, दत्तात्रय ठोंबरे बालाजी कलवले यांनीही सहकार्य केले. या निवडी संपन्न होत असताना पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर बोलत असताना उपसभापती संतोष गदादे यांनी संस्था काटकसरीने व सभासद हीत जपत चालवण्याची ग्वाही दिली. तसेच सभापती सतीश दराडे यांनी पतसंस्था सर्व समाजाला बरोबर घेऊन पारदर्शी करण्याबरोबर आदर्शवत कामकाज करण्यासाठी लवकरच मोबाईल ॲपच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज केले जाईल याची ग्वाही दिली.

यावेळी कास्टट्राईब संघटनेचचे अध्यक्ष सुहास मोरे इब्टाचे नेते शशिकांत शेंडे ,संघाचे नेते अनिल शिंदे माजी सरचिटणीस प्रशांत भिसे युवक नेते नितीन राठोड ,माजी चेअरमन बालाजी कलवले तज्ञ संचालक लाळगे तज्ञ संचालक सहदेव काशीद, माजी चेअरमन दत्तात्रय ठोंबरे संचालक किशोर वाघ,बंडु महाराज घोळवे, संचालिका संगीता पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्वाभिमानी परिवाराचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. विद्यमान सचिव अंबादास नरुटे यांनी सूत्रसंचलन व आभार व्यक्त केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow