भिगवण जवळ तीन म्हशींना चार चाकीची जोरदार धडक

Sep 14, 2024 - 20:40
Sep 14, 2024 - 20:41
 0  544
भिगवण जवळ तीन म्हशींना चार चाकीची जोरदार धडक

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीक सकुंडे वस्ती जवळ एका चार चाकी भरधाव कारने जनावरांना धडक दिली आहे.या अपघातात तीन म्हशींचे पाय निकामी झाले असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.तर क्रेटा गाडीचेही या अपघातात नुकसान झाले आहे.

सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शेतातून चरून घरी निघालेल्या तीन म्हशी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होत्या.याच वेळी पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या क्रेटा (एमएच १२ डब्लूई ९२६८) या भरधाव कारने या म्हशींना जोरदार धडक दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow