दौंड मध्ये रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ! रविवारी पहाटे घडली घटना
आय मिरर
दौंड तालुक्यात यवत रेल्वे स्टेशनच्या हद्दीत रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेत अपघात होऊन एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.दौंड ते पुणे लोहमार्गावरील यवत जवळ रविवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे मार्ग ओलांडताना एका बिबट्याला रेल्वेची धडक बसली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दौंड तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.पाटस, वरवंड या भागात वाड्यावस्त्यांवर उसाच्या शेतात बिबट्या सर्रासपणे दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी कडेठाण आणि बोरीपार्धी गावच्या हद्दीत बिबट्याने चिमुकल्या मुलावर हल्ला केला होता. त्यानंतर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केले होते.
दरम्यान या घटनास्थळाच्या आसपास अजूनही काही बिबटे वावरत असल्याचा परिसरातील शेतकऱ्यांना संशय आहे. लोकांमध्ये भितीचे वातावरण असल्याने वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
What's Your Reaction?