मोठी बातमी | इंदापूर बाह्य वळणावर अवजड वाहतूक करणारा ट्रक पलटला

Sep 15, 2024 - 10:49
 0  623
मोठी बातमी | इंदापूर बाह्य वळणावर अवजड वाहतूक करणारा ट्रक पलटला

आय मिरर

इंदापूर बाह्य वळणावर एका मालवाहू ट्रकला अपघात झालाय. पुढे निघालेल्या स्विफ्ट कारने अचानक ब्रेक मारल्यामुळे या स्विफ्ट ला वाचवण्याच्या नादात हा मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळत असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

घटनास्थळी महामार्ग पोलिस आणि इंदापूर पोलीस यासोबतच एन एच आय चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार MH 25 AS 61 15 क्रमांकाची स्विफ्ट कार सोलापूरच्या दिशेने निघाली होती. इंदापूर बाह्यवानावरील महात्मा फुले चौकात चौकाच्या परिसरात आल्यानंतर या स्विफ्ट कारच्या चालकांना अचानक ब्रेक मारला आणि पाठीमागून आलेला 

KA 56 2190 क्रमांकाचा अवजड वाहतूक करणाऱ्या या ट्रकचा स्विफ्ट कारला धक्का लागला.या स्विफ्ट कारला वाचवण्याच्या नादात हा मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाला आहे.

घटना समजताचं महामार्ग पोलिस डाळज मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे,ए एस आय दत्तात्रय मदने,पोलिस हवालदार जगदाळे,इंदापूर पोलिस ठाण्याचे पो.हवाल पद्मसिंह शिंदे,यांसह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उमेश जाधव,गौरव घोडके दाखल झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow