मोठी बातमी ! पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण नजीक एलपीजीचा टँकर पलटला,सुदैवानं मोठी दुर्घटना टळली
आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेला एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. भिगवण नजीक बिल्ट कंपनीच्या समोर ही दुर्घटना घडली आहे.टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे सोलापूर महामार्गावर सर्व्हीस रोड आणि मुख्य मार्गाच्या मधल्या चारीत हा टँकर पलटी झाला आहे.सुदैवाने मोठी दुर्घटना टळली गेली.
हि घटना समजताचं इंदापूर पोलीस मदत केंद्राचे अधिकारी पोलीस कर्मचारी, भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, एन.एच.ए.आय चे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि बिल्ट कंपनीची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून हा पलटी झालेला टँकर उचलण्याचे काम सुरु आहे.दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती.
शनिवारी दि.०९ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भादलवाडी गावचे हद्दीत बील्ट कंपनी जवळ हा अपघात घडला आहे. टँकर चालक खाजाउद्दीन शेख हा आपल्या ताब्यातील टँकर घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाला होता. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एल.पी.जी. वाहतुक करणारा वाहन क्रमांक MH 46 BB 9436 हा टँकर मुख्य रस्ता आणि सर्व्हीस रस्त्याच्या मध्ये असणा-या चारीत पलटला गेला. यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे किरण के सिनकर यांच्या तपासणी नंतर हा टँकर उचलण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
What's Your Reaction?