विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभवाच्या शिदोरीचा जीवनात उपयोग करावा - राजवर्धन पाटील

Jan 29, 2024 - 17:49
 0  337
विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभवाच्या शिदोरीचा जीवनात उपयोग करावा - राजवर्धन पाटील

आय मिरर(देवा राखुंडे)  

शिक्षण घेत असताना कधी घराबाहेर राहून आपले दैनंदिन कार्य पार पाडावे लागते. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आपल्याला अनुभव , व्यावहारिक कौशल्य तसेच कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या क्षमतेने सर्व क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बिजवडी येथे केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे , राष्ट्रीय सेवा योजना व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित 'युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ' उपक्रमांतर्गत बिजवडी ता. इंदापूर येथे दि. 23 जानेवारी ते दिनांक 29 जानेवारी या कालावधीत विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

दरम्यान राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत परिसरातील ऊसतोडणी मजूरांना मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.  

प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना शिक्षणातील पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक,सामाजिक ज्ञान संपादनासाठी व कौशल्य विकसित करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरे उपयोगी ठरतात असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. उत्तम माने यांनी केले. 

औदुंबर कचरे , मच्छिंद्र अभंग , देवराज लोकरे , धर्मराज चव्हाण , सतीश चव्हाण ,बाळासाहेब भोंगळे, डॉ.शिवाजी वीर ,डॉ.प्रज्ञा लामतुरे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रा. नामदेव पवार व मयूर मखरे यांनी तयार केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका मनीषा गायकवाड , प्रा. प्रशांत साठे , प्राध्यापिका सुवर्णा जाधव, प्रा.धनंजय माने, प्रा.अमोल मगर ,प्रा. संतोष पानसरे व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow