विकसित भारत संकल्प यात्रा आज इंदापूरात ; केंद्राच्या विविध योजनांची दिली जाणार माहिती
आय मिरर
केंद्र शासन पुरस्कृत व इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमाने विकसित भारत संकल्प यात्रा बुधवार दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता इंदापूर शहरात दाखल होणार आहे.यावेळी भाजपा नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.शहरातील १०० फुटी रोड नवीन नगरपरिषद कार्यालय शेजारील मैदानात या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या विविध योजनाबाबत विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत जनजागृती केली जात असून विविध योजना अंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवणे हा विकसित भारत संकल्प यात्रा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्याकरिता इंदापूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्व इंदापूर शहरवासीयांना सदर कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ही मुख्याधिकारी कापरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या कोणत्या योजनांचा समावेश…
१. आयुष्यमान भारत योजना
२. हेल्थ कॅम्प Health Camp
३. आधार कार्ड अपडेट Adhar Update
४. पी एम उज्वला योजना Pm Ujjawala
५. पी एम स्वनिधी PMSvanidhi
६. दीन दयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान DAY-NULM
७.पी एम मुद्रा योजना PM Mudra
८. प्रधानमंत्री आवास योजना PMAY
९. स्वच्छ भारत अभियान
१०. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना
११. सौभाग्य योजना
१२. स्टार्ट अप इंडिया Start Up India
१३. उजाला योजना Ujala Yojana
१४. खेलो इंडिया Khelo India
१५. डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर
१६. पी एम भारतीय जन औषधी परियोजना
१७. सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग PMFME
१८. प्रधानमंत्री मातृवंदना योजना
१९. प्रधानमंत्री जनधन योजना
What's Your Reaction?