पुलावामा हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण ! इंदापूर नगरपरिषदेसमोर शहिदांना वाहिली श्रद्धांजली
आय मिरर(देवा राखुंडे)
जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातोय. मात्र, पाच वर्षांपूर्वी हाच दिवस देशासाठी आणि भारताच्या जवानांसाठी काळा दिवस ठरला.14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करून हा दिवस रक्तरंजित केला. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पुलवामा जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीनं सीआरपीएफच्या जवानांच्या बसला धडक दिली. त्यात 40 जवान शहीद झाले. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. या शहिदांना पुण्याच्या इंदापूर नगरपरिषदेसमोरील स्वातंत्र्य सैनिक स्मारका जवळ बुधावारी दि.14 फेब्रुवारी रोजी जय हिंद माजी सैनिक संघटना,युवा क्रांती प्रतिष्ठान,शिवभक्त परिवार आणि मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांसह इंदापूरकरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान नगरपरिषद प्रांगणातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पन करीत शहिद जवान अमर रहें, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी हल्ल्यातील शहिदांना विविध मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पन करीत या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला.माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप,माजी सैनिक मारुती मारकड,माजी सैनिक कैलास गवळी यांनी मनोगते व्यक्त त्या रक्तरंजित आठवणी जाग्या केल्या.इंदापूर शहरात प्रलंबित असणारा शहिद सैनिक स्मारकाचा प्रश्न प्रशासनाने तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.
What's Your Reaction?