"त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती,गडी थोडक्यात हुकला 2029 ला बघू" सभापती राम शिंदेंचे रोहित पवारांना आव्हान
आय मिरर
ज्याने आपल्याला पाडले त्याला पाडायची इच्छाशक्ती दांडगी होती गडी थोडक्यात हुकला,ती बी थोडा फार दगाफटका झाला म्हणून नाहीतर गाठलं होत.2019 ला त्रेचाळीस हजार मतांचा फरक होता.आता सहाशे मतांवर आल आहे 2029 ला बघू पुन्हा एकदा दाखवू असे आव्हान विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार नाव न घेता दिले.
इंदापूर येथे महाराष्ट्र विधानपरिषद सभापतीपदी प्रा.राम शिंदे यांची तसेच राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची निवड झाल्याबद्दल भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे,भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, नवनाथ पडळकर, शशिकांत तरंगे, माऊली चवरे, मारुतीराव वणवे,गजानन वाकसे, तानाजी थोरात, माऊली वाघमोडे, हनुमंत कोकाटे, तेजस देवकाते,शिवाजी मखरे, बाळासाहेब सरवदे, लक्ष्मण देवकाते, सिमा कल्याणकर, किरण गानबोटे यांचेसह मोठ्या संख्येने आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माझ्या सत्कार समारंभात सांगितले की तुमच्यावर तीळा एवढाही भ्रष्टाचाराचा डाग नाही म्हणून मी आर आर पाटलानंतर तुमच्या सत्कार सोहळ्याला आलो. मी अण्णा हजारे यांचे आभार मानतो.जरांगे पाटील यांनीही मागील दोन दिवसापूर्वी माझ्याबद्दल म्हणाले माणूस चांगला आहे म्हणून सांगितले.
तसेच आपण ज्या पदावर जातो त्या पदाला आपण कोणत्या पद्धतीने न्याय देतो हे महत्त्वाचे आहे.राजकीय जीवनात मी आता सर्वोच्च पदावर गेलो आहे जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे असेही प्रा.शिंदे यांनी सांगितले.
What's Your Reaction?