लोकसभा निवडणूक घोषित होऊन काही तास होतात ना तोच इंदापूरातील गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू

Mar 16, 2024 - 23:48
Mar 17, 2024 - 08:47
 0  13038
लोकसभा निवडणूक घोषित होऊन काही तास होतात ना तोच इंदापूरातील गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू

आय मिरर

लोकसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे. उद्यापासून देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल. अशात जिल्ह्यातील इंदारपूरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात परवाना धारक लोकांना त्यांचे हत्यार जमा करण्यास सांगण्यास आले होते. अशात गुन्ह्यात वापरण्यात आलेलं हत्यार कुठून आलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या हॉटेलचा व्हिडीओ समोर आला आहे.

इंदापूरमध्ये गोळी घालून एकाची हत्या

इंदापूरच्या शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये शनिवारी दि.16 मार्च रोजी रात्री 08 च्या सुमारास एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते. ही घटना इंदापूरच्या बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोक्यातही गोळी लागली. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow