भिगवण जवळ तीन वाहनांचा भीषण अपघात,जीवितहानी नाही मात्र वाहनांचं मोठं नुकसान

आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील भिगवन जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
यात दोन वाहनावरील चालक गंभीर जखमी झालेत. त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि भिगवन पोलिसांनी तात्काळ उपचार कामी रुग्णालयात दाखल केलंय. तर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या बल्कर टँकरला वाहन क्रमांक MH 46 BU 4292 याला पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पो वाहन क्रमांक Mh 26 BE 5622 ने जोराने धडक दिली आणि याचवेळी आयशर टेम्पोच्या पाठीमागे असणाऱ्या कंटेनर ने वाहन क्रमांक MH 13 CU 5487 देखील आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली.यामध्ये पाठीमागील दोन्ही गाड्यांमध्ये चालक अडकून पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूरचे एस आय संतोष काळे, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस कॉन्स्टेबल वागस्कर पोलीस कॉन्स्टेबल संतोष आटोळे हे अपघात तरी दाखल झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
What's Your Reaction?






