तिनं गावाला गंडवलं रोख रकमेसह सोनं नाणं लुबाडलं पण…! तो तिच्यापेक्षा भारी ठरला मावशी चला चहा पाजतो म्हणून त्यानं थेट पोलीस स्टेशन दाखवल अन् खेळ खल्लास झाला……
आय मिरर
संमोहित करून दिवसाढवळ्या एका महिलेला चक्क तिच्याच घरात जाऊन लुबाडल्याची धक्कादायक घटना इंदापूर शहरातील राजेवलीनगर भागात असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये घडली होती.गळ्यात माळ आणि हातात पिठाची परडी घेऊन जोगवा मागण्याच्या बहाण्याने आलेल्या या अज्ञात महिलेने इंदापूरातील एका महिलेच्या घरात बहाना करुन प्रवेश केला. तिला संमोहित करत भुरळ पाडत सव्वा तोळे सोन्याचे दागिणे, नवीन साड्या आणि तीन हजारांच्या आसपास रक्कम घेऊन ती पसार झाली.त्यानंतर फार उशीराने आपण फसलो गेलो असल्याचं या अपार्टमेंटमधील महिलेच्या लक्षात आलं. संमोहित करणारी ही महिला संबंधित अपार्टमेंटमध्ये जात असतानाचा सीसीटिव्ही फुटेजही सोशल मीडियावर वायरल झाला होता.
तिनं गावाला गंडवलं रोख रकमेसह सोनं नाणं लुबाडलं पण…! तो तिच्यापेक्षा भारी ठरला मावशी चला चहा पाजतो म्हणून त्यानं थेट पोलीस स्टेशन दाखवल अन् खेळ खल्लास झाला……कारण एका जागृत पत्रकारामुळे तिला अटक करण्यात पोलीसांना यश आलं असून माया सागर साळुंखे असं या महिलेचं नांव आहे.ती नाशिक मधील आहे. या महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
इंदापूर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मोहिते हे नेहमीप्रमाणे इंदापूरकडे येत असताना इंदापूर अकलूज मार्गावार त्यांना ही महिला दिसली. व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओ त्यांनी पाहिला असल्याने एका क्षणात त्यांची बत्ती पेटली अन् सर्वांना गोड बोलून गंडवणा-या या महिलेला मोहिते भारी पडले. मावशी गाडीवर बसा तुमची सेवा करायचीय,तुम्हाला चहा पाजतो म्हणत त्या महिलेला त्यांनी चार माणसात आणलं अन् काही कळायच्या आत पोलीस गाडी बोलावून घेतली.
गोड बोलून सर्वांना गंडवणारी ही महिला एका क्षणात कशी फसली गेली हे तिलाही समजलं नाही. मात्र निळकंठ मोहितेंसारख्या जागृत पत्रकारामुळे हे शक्य झाल्याने अवघ्या इंदापूरकरांना मोहिते यांचा अभिमान वाटतोय.शिवाय पत्रकारांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण देखील बदलाला गेला. संबंधीत महिलेकडून अनेक ठिकाणवरुन लुट केलेले सोन्याचे दागिणे पोलीसांनी हस्तगत केले असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.या महिलेस अटक करण्यात आली असून इंदापूर न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.
What's Your Reaction?