अंगणवाडी सेविकांनी हर्षवर्धन पाटलांना राख्या बांधत साजरं केलं रक्षाबंधन ! केली ही मागणी

Aug 30, 2023 - 10:38
Aug 30, 2023 - 10:41
 0  316
अंगणवाडी सेविकांनी हर्षवर्धन पाटलांना राख्या बांधत साजरं केलं रक्षाबंधन ! केली ही मागणी

आय मिरर

अंगणवाडी सेविका व मदतनीस या भगिनींनी इंदापूर येथे राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी सुमारे 200 + अंगणवाडी सेविका व मदतीस भगिनी उपस्थित होत्या.

रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅज्युएटी मिळावी, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, अंगणवाडी केंद्रांचे भाडे वाढवून मिळावे, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात रक्कमेंत वाढ करणे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासन दरबारी सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस या भगिनींनी केली. 

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मागण्या व प्रश्न शासन दरबारी निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अंगणवाडी सेविकांना दिली.

 याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे, पुणे जिल्हा उपाध्यक्षा पुनमताई निंबाळकर, बिलकिश काझी, तनया जाधव, सीमा खामगळ, तुळसा जाधव, शुभांगी शिंदे, उषाकिरण सावंत, सुनीता माळवदकर, संगीता रणवरे, सुवर्णा कुलकर्णी, वर्षा गाढवे, सविता मखर, सविता रायकर, सोनाली पावडे , हडपसर शहर अध्यक्षा नीता पायगुडे व मोठया संख्येने सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.

राज्याचे महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री असताना आपण राज्यामध्ये सुमारे 1 लाख अंगणवाड्या एका सहीने मंजुर केल्या, त्यामुळे सध्या हजारो भगिनी ह्या अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून काम करीत आहेत, असे यावेळी राज्य अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow