जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत इंदापूर नगरपरिषदेचा डंका, कबड्डीत पहिला तर रस्सीखेच मध्ये तिसरा क्रमांक

Jan 13, 2025 - 07:58
 0  185
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत इंदापूर नगरपरिषदेचा डंका, कबड्डीत पहिला तर रस्सीखेच मध्ये तिसरा क्रमांक

आय मिरर

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत इंदापूर नगरपरिषदेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवलाय.जिल्हास्तरावर अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आलं होतं यात इंदापूर नगर परिषदेने दैदीप्यमान यश मिळवल्यानंतर जल्लोष साजरा केलाय.

राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करणेसाठी पोषक वातावरण निर्माण करणेसाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहीले राज्य आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.श्री.व्यंकटेश दुर्वास,जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 जानेवारी ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत बारामती शहरात या स्पर्धा पार पडल्या.

या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट,कबड्डी,रस्सीखेच व्हॉलीबॉल यांसारखे सांघिक खेळ तसेच धावणे,चालणे,गोळा फेक ,थाळी फेक,लांब उडी,उंच उडी, टेबल टेनिस ,बॅडमिंटन, कॅरम,बुद्धिबळ यासारख्या वैयक्तिक खेळांचे तसेच सांस्कृतिक खेळांचा समावेश होता. यात इंदापूर नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी क्रिकेट,कबड्डी, रस्सीखेच या सांघिक खेळात तसेच विविध वैयक्तिक खेळात सहभाग नोंदविला होता.  

तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेने कबड्डी या खेळात प्रथम क्रमांक तर रस्सीखेच या खेळात तृतीय क्रमांक पटकावला.तसेच धावणे,लांब उडी, बॅडमिंटन ,कॅरम,बुद्धिबळ यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारातदेखील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.   

400 मिटर रिले स्पर्धेत शिवदत्त भोसले, विवेकानंद बिराजदार, नितीन जगताप व राजू भानवसे यांनी 3 रा क्रमांक, तर प्रसाद देशमुख यांनी 200 मिटर धावणे स्पर्धेत व लांब उडी प्रकारात अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक तसेच टेबल टेनिस डबलेस मध्ये शिवदत्त भोसले व प्रसाद देशमुख यांनी 3 रा क्रमांक पटकवला.

या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी पार पडला.यावेळी दत्तात्रय लांघी,उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे,व्यंकटेश दुर्वास,जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय पुणे,तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow