इंदापूरात आ.गोपीचंद पडळकरांनी सभेच्या सुरुवातीलाच केलं पवारांना लक्ष,म्हणाले एसटीडीच्या गुलामगिरीतून मुक्त कधी होणार..? 

Oct 16, 2023 - 16:17
 0  940
इंदापूरात आ.गोपीचंद पडळकरांनी सभेच्या सुरुवातीलाच केलं पवारांना लक्ष,म्हणाले एसटीडीच्या गुलामगिरीतून मुक्त कधी होणार..? 

आय मिरर

गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षण मिळावे यासाठी धनगर जागर यात्रा महाराष्ट्र भर आयोजित केली आहे. सोमवारी दि.15 आँक्टोंबर रोजी ते पुणे जिल्ह्यातील इंदापुरात आले होते त्यांनी जाहीर सभेच्या सुरुवातीलाच पवारांचा लांडगा म्हणून उल्लेख केला.घोषणा एवढ्या जोरात द्या की लांडग्याच्या कळपात आवाज घूमला पाहिजे असं म्हणतं पवारांना लक्ष केले.

तुम्ही बारामतीच्या एसटीडीच्या गुलामगिरीतून कधी मुक्त होणार..? 

या सभेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेदरम्यान इंदापूरमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबावर जोरदार टिका केली.इथल्या जनतेला गुलामगिरीत रहायची सवय लागली आहे.त्यांना कितीही समजावलं तरी एसटीडीच्या गुलामगिरीतून ते मुक्त होत नाहीत.आता साहेब, ताई आणि दादा या एसटीडीच्या दबावात राहू नका.इंग्रजांप्रमाणे त्यांनी व्यवस्था केलीय.हे साहेब आले ते आले..साहेब आपला कुणी नाही..एकच साहेब फक्त बाबासाहेब.. अशा शब्दात पडळकर यांनी पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला.

इंदापूर येथे धनगर जागर यात्रेत पडळकर यांनी पवार कुटुंबियांना लक्ष्य केलं.पवार कुतुंबावर टिका करतानाच बाबासाहेब यांच्यामुळे आपण माणसात आहोत.मी रोज त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेवून बाहेर पडतो,असं पडळकर यांनी म्हटलंय आहे.साहेब म्हणणं सोडून द्या.दबावात रहाणे सोडा.तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं असेल तर संघटीत व्हा आणि गुलामगिरी सोडा असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow