बिग ब्रेकिंग | बारामतीची घटना ताजी असतानाच इंदापुरात गोळीबार,एक गंभीर

Sep 30, 2024 - 19:44
Sep 30, 2024 - 19:45
 0  3909
बिग ब्रेकिंग | बारामतीची घटना ताजी असतानाच इंदापुरात गोळीबार,एक गंभीर

आय मिरर

बारामती मधील घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय आणि या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे.तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय.त्याला तीन राउंड लागले असल्याची ही माहिती मिळत आहे

घटना घडताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे

एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आली त्यानं तीन ते चार राऊंड फायर केले त्यापैकी तीन राऊंड समोरील व्यक्तीला लागले आणि यात समोरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत असून इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. ज्याच्यावर गोळीबार झाला त्याला तातडीने रुग्णालयात उपचार कमी दाखल करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow