डिकसळ गावात बिबट्याची दहशत कायम ; नागरिकांमध्ये घबराट

Oct 17, 2023 - 19:17
 0  1398
डिकसळ गावात बिबट्याची दहशत कायम ; नागरिकांमध्ये घबराट

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावात मंगळवार दिनांक १७ रोजीच्या रात्री पुन्हा बिबट्याने भर लोक वस्तीत दहशत निर्माण केली असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.सोमवार दिनांक 16 रोजी पहाटे बिबट्याने सतीश बाशीराम झाकणे यांच्या शेतातील वासरू गोट्यातून पळून नेऊन ते खाल्ले होते. या घटनेनंतर वनरक्षक यु.डी. मोरे यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. परंतु पुढील कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यानंतर मात्र दि.17 रोजी रात्री बिबट्याने चक्क गावात शिरकाव करून पत्रकार विजयकुमार गायकवाड यांच्या घरासमोरील शेळ्यांचा गोठा व कोंबड्यांचा खुरवडा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा तो प्रयत्न लोखंडी जाळी जाड असल्याने फसला.

दरम्यानच्या काळात कोंबड्या व शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील लोक जागे झाल्याने त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर तेथून बिबट्याने योगेश्वरी मंदिराकडे पलायन केले. घटनेची माहिती वनरक्षक यु. डी. मोरे यांना दिल्यानंतर त्यांनी कालच्या प्रमाणे आज घटनास्थळी भेट दिली. वन विभागाकडून भेटी शिवाय कुठलीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पाहिला मिळत आहे. तसेच योगेश्वरी मंदिरात नवरात्र उत्सव चालू असल्याने महिला वर्ग मंदिराकडे जाण्यासाठी घाबरत आहेत. डिकसळ गावामध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow