इंदापूरातील जगदंबा मध्ये अविनाश धनवेला संपवल्यावर आरोपी कसे झाले फरार? धक्कादायक CCTV फुटेज आलं बाहेर

Mar 18, 2024 - 06:41
Mar 18, 2024 - 07:06
 0  7416
इंदापूरातील जगदंबा मध्ये अविनाश धनवेला संपवल्यावर आरोपी कसे झाले फरार? धक्कादायक CCTV फुटेज आलं बाहेर

आय मिरर

इंदापूरमधील गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ला प्रकरणानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य खूपच भयानक होतं ज्यामुळे लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीती बसली असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल जगदंबा प्युअर व्हेजमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये मारेकरी हल्ला करुन हॉटेलमधून पळत जात आहेत.

मृत व्यक्तीचं नाव अविनाश धनवे असून शनिवारी 16 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास इंदापूर येथे जगदंबा हॉटेलमध्ये जेवण करायला गेले असताना आठ जणांनी धनवे याच्यावर दोन रिवाल्वरच्या माध्यमातून डोक्यामध्ये शरीरावर गोळ्या घातल्या नंतर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. अविनाश धनवे यांच्यावर यापूर्वीचे गुन्हे दाखल असून पूर्व वैमन्यासातून ही आत्या झाल्या असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सांगितलं. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आले असून हत्यानंतर आरोपी पसार झाले आहेत.

समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओ दिसत आहे की, हल्ला करणारे अज्ञात लोक येतात आणि कारमधून उतरुन कोयता आणि बंदूक घेऊन हॉटेलमध्ये शिरतात. हल्ला करुन एखाचा खून करुन ते लगेच पळ काढतात. हॉटेलच्या बाहेर लावलेल्या गाड्यांमध्ये बसून त्यांनी पळ काढला. ही थरारक घटना असून परिसरात लोक पूर्णपणे घाबरले आहेत.

दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही व्हायरल झालाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार आणि हल्ला करणारे हे अज्ञात लोक कोण होते याविषयी आता पोलीस तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow