इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जालना येथील मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा

आय मिरर
जालना अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनाकांवर पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आलाय या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुका (शरद पवार गट) यांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. शिवाय या आंदोलकांना पाठींबा देखील दर्शवण्यात आला आहे.या संदर्भातील लेखी निवेदन इंदापूरचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,आंदोलनात बसलेल्या हजारो आंदोलन कार्यकर्त्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावर आंदोलन कर्त्यांवर बेदम मारहाण लाठीचार्ज केल्याप्रकरणी या सर्व प्रकरणाची सखोल सीआयडी मार्फत चौकशी करावी. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर निलंबन करून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेत जबाबदार धरून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सागर मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्षा छाया पडसळकर, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभाग विकास खिलारे, अरबाज शेख, श्रीकांत मखरे, संमद सय्यद, चंद्रकांत सरवदे, अनिल ढावरे, साजन ढावरे, अविनाश रणदिवे, अशोक पापत, नागेश क्षत्रिय, सुनील टोणपे इत्यादींच्या सह्या आहेत.
What's Your Reaction?






