काझड ग्रा.पं. च्या 11 पैकी भाजपच्या 6 सदस्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार
आय मिरर
काझड ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ग्रा.पं. च्या 11 सदस्यांपैकी भाजपच्या निवडून आलेल्या 6 सदस्यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो येथे रविवारी (दि.12) सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नूतन सदस्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
काझड ग्रामपंचायतीमध्ये भाजप प्रणित सिद्धेश्वर स्वाभिमानी ग्रामविकास पॅनलचे 6 सदस्य निवडून आलेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अर्जुन सदाशिव नरूटे, वैभव महादेव नरुटे, दिपाली सचिन झगडे, कु.अश्विनी अंबादास वाघमोडे, हनुमंत नामदेव वीर, मोनाली अजित चव्हाण या 6 ग्रा.पं. सदस्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यामध्ये कु.अश्विनी अंबादास वाघमारे या ग्रामपंचायत सदस्या 22 वर्षे एवढ्या कमी वयाच्या आहेत, त्यांचे हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केले. यावेळी श्रीरंग शिंदे, शिवाजी पाटील, नाथा पाटील, सुभाष झगडे, विश्वास पाटील, उत्तम पांढरे, तुषार ठोंबरे, बाबासो पाटील, संदीप शिंदे, प्रताप पाटील, दशरथ पाटील, दीपक पाटील, साहिल खंडागळे आदी काझड गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?