गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 3 नूतन पदाधिकाऱ्यांचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सत्कार
आय मिरर
गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 3 नूतन पदाधिकाऱ्यांचा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते बावडा येथे रत्नाई निवासस्थानी बुधवारी दि.27 सत्कार करण्यात आला.
ग्रा.पं.च्या नूतन उपसरपंच योगिता राजेंद्र पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय बापूराव जाधव, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मच्छिंद्र सुदाम खटके यांचा निवडीबद्दल हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी गोंदी-ओझरे गावच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गावामध्ये चांगली विकास कामे करावीत, विकास कामासाठी सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गोंदी-ओझरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच इंदुबाई रामहरी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अनेक विकासकामे चालू असल्याचे हर्षवर्धन पाटील सांगितले. या सत्कार प्रसंगी पै.रणजीत वाघमोडे, अगंध देशमुख, विलास जाधव, भारत पालवे दिलीप हजारे, बापूराव खटके, मालोजीराजे शिंदे, महादेव सूर्यवंशी, अरविंद बोबडे, किरण वाघमोडे, जितेंद्र चव्हाण, अमर डांगे, आनंद चव्हाण, संतोष शिंगाडे, अमोल सुळ, सचिन सुळ, युवराज डांगे, दीपक बनसुडे, किशोर खटके, किरण कटके, माधव मोरे, ग्रामसेवक गणेश लंबाते उपस्थित होते.
What's Your Reaction?