जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडणार "राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा"

Sep 29, 2023 - 17:28
 0  1526
जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडणार "राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा"

आय मिरर

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यट स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी ०५ आँक्टोंबर २०२३ रोजी ही स्पर्धा इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे. याकरिता पूर्व नांव नोंदणी आवश्यक आहे.

मागील वर्षापासून जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीच्या वतीने राज्यस्तरीय भव्य आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळवा, त्यांचे भविष्य उज्वल घडावे व आदर्श पिढी निर्माण व्हावी हा आमचा प्रयत्न असतो. तरी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करुन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले आहे.

ही स्पर्धा तीन गटात पार पडणार असून लहान गटात इ. १ ली ते ४ थी चा समावेश असेल यासाठी ३ + १ = ४ मिनीटांचा वेळ असेल.यात पुस्तक माझा मित्र,युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज,माझा आवडता संत आणि माझी सावित्री होती म्हणून हे विषय असतील.उन्मेश बोरकर - मो.नं. ९९६०८७९६८७ यांच्याकडे नांव नोंदणी करता येईल. यातील विजेत्यांना प्रथम क्रमांक रु. १००१/- चषक व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक रु. ७०१/- चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रु. ५०१/- चषक व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ १) रु. ३०१/- व प्रमाणपत्र २) रु.३०१/- व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

दुसरा मध्यम गट असेल यात इ. ५ वी ते ७ वी पर्यंतचा समावेश असेल. यात स्पर्धकास वेळ ४ + १ असा ५ मिनीटांचा असेल आणि व्यसन सोशल मिडियाचे पलटले चित्र समाजाचे,शेतकरी आत्महत्या व युवकांची भुमिका,

चंद्रविजयी भारत आणि आमचे मार्गदर्शक कोण? शिक्षक की सेलिब्रिटी असे विषय असतील. यासाठी नांव नोंदणी निखिल मुळे - मो.नं. ९७३००४०७९३ यांच्याकडे करता येईल.यात प्रथम क्रमांक मिळवण्या-या स्पर्धकास प्रथम क्रमांक रु. ३००१/- चषक व प्रमाणपत्र,व्दितीय क्रमांक रु. २००१/- चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक - रु.१००१/- चषक व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ १) रु.५०१/- व प्रमाणपत्र २) रु.५०१/- व प्रमाणपत्र देण्यात येईल.

तर मोठ्या गटात इ. ८ वी ते १२ वी चा समावेश असेल. यासाठी स्पर्धकांना ५+१= ६ मिनीटांची वेळ असणार आहे.वेदना जाणावया चला जागवू संवेदना,ये आई सांग ना बाबांना, मलाही जगायचयं ! , आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का? आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून आम्ही काय घ्यावे? असे विषय असतील. यासाठी श्रीमंत गुरव - मो.नं. ९८६००५८०८१ यांकडे नांव नोंदणी करता येईल.यातील विजेत्या स्पर्धकास प्रथम क्रमांक रु. ५००१/- चषक व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांक रु. ३००१/- चषक व प्रमाणपत्र,तृतीय क्रमांक रु.२००१/- चषक व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ १) रु. ५०१/- व प्रमाणपत्र २) रु.५०१/- व प्रमाणपत्र आयोजकांकडून देण्यात येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow